पुढारी वृत्तसेवा : आसामच्या धुबरी Assam Earthquake जिल्ह्यात आज (रविवार) सकाळी भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.१ इतकी नोंदवली गेली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे ३.१ वाजता हा भूकंप झाला. भूगर्भात १७ किमीवर याचे केंद्र होते. यामध्ये कोणत्याही जीवित अथवा वित्तहानीची नोंद अद्याप समोर आली नाही.
तत्पूर्वी, शनिवारी संध्याकाळी 6 वाजता मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकपाची तीव्रता कमी असली तरी भूकंपाचे धक्के जाणवले. सिवनी येथील भूकंपाची तीव्रता 1.8 एवढी होती. त्याआधी शुक्रवारी संध्याकाळी ६.४७ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्केही जाणवले. भूकंपाची तीव्रता 2.9 इतकी मोजली गेली.
हेही वाचा :