Meesho lays off | ‘मीशो’कडून दुसऱ्यांदा नोकरकपात, २५१ कर्मचाऱ्यांना नारळ

Meesho lays off | ‘मीशो’कडून दुसऱ्यांदा नोकरकपात,  २५१ कर्मचाऱ्यांना नारळ
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : ई-कॉमर्स फर्म मीशोने (E-commerce firm Meesho) शुक्रवारी ऑर्गनायजेशनल रिस्ट्रक्चरिंगचे कारण देत सुमारे १५ टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. या नोकरकपातीमुळे २५१ कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. या प्रभावित कर्मचार्‍यांना २.५ ते ९ महिन्यांचे पेमेंट, विम्याचे लाभ, नोकरी प्लेसमेंटसाठी मदत केली जाणार असल्याचे मीशोने म्हटले आहे. (Meesho lays off)

बंगळूर येथील मीशो स्टार्टअपमधील नोकरकपातीची ही दुसरी फेरी आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या ई-कॉमर्स फर्मने त्यांचा किराणा व्यवसाय फार्मिसो बंद केला होता. त्यावेळी मीशोने ३०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी केले होते.

मीशोचे सीईओ आणि सह-संस्थापक विदित आत्रे (Meesho's CEO and co-founder Vidit Aatrey) यांनी शुक्रवारी कर्मचार्‍यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये नमूद केले आहे की वाढत्या गुंतवणुकीमुळे कंपनीच्या उलाढालीत २०२० ते २०२२ पर्यंत १० पटीने वाढ झाली. पण असे असताना मॅक्रो इकोनॉमिक स्थिती बदलली आहे. "परिणामी, आम्हाला नफ्यात येण्यासाठी आमच्या टाइमलाइनला गती द्यावी लागली…," असे आत्रे यांनी म्हटले आहे.

याधी Meesho ने भारतातील ९० टक्क्यांहून अधिक शहरांमधील (नागपूर आणि म्हैसूर वगळता) सुपरस्टोअर किराणा व्यवसाय बंद केला होता. यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने ते बेरोजगार झाले. मीशोने सुपरस्टोअर बंद केल्याने जवळपास ३०० कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या.

कमी महसूल आणि अधिक खर्च हे देशातील बहुतांश शहरांमधील व्यवसाय बंद करण्याच्या Meesho च्या निर्णयामागचे कारण होते. मीशोचे सुपरस्टोअर कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या सहा राज्यांमध्ये कार्यरत होते. (Meesho lays off)

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news