हिवाळ्यात कमी पाणी पिताय?; जाणून घ्‍या शरीरावर काय दुष्‍परिणाम होतील

हिवाळ्यात कमी पाणी पिताय? सावध व्हा!
हिवाळ्यात कमी पाणी पिताय? सावध व्हा!

नवी दिल्ली : उन्हाळ्यात आपल्याला तहान अधिक लागते व साहजिकच आपण अधिक पाणी पित असतो; मात्र हिवाळ्यात बरेच लोक कमी पाणी पितात. अर्थातच असे करू नये कारण आपल्या शरीरासाठी 'हायड्रेट' राहणे खूप महत्त्वाचे आहे. उन्हाळा असो वा हिवाळा, पिण्याचे पाणी अतिशय महत्त्वाचे आहे. पाणी कमी प्यायल्याने अनेक आजार होऊ शकतात. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट होते आणि हानीकारक पदार्थ शरीरातून निघून जातात. त्यामुळे पाणी पिणे खूप गरजेचे आहे. कमी पाणी पिण्याने मेंदूचेही नुकसान होऊ शकते.

आपल्या शरीरात सुमारे 60 टक्के पाणी आहे आणि दररोज 2.5 लिटर पाणी शरीरातून बाहेर पडते. जेव्हा शरीरात 10 टक्के पाण्याची कमतरता असते तेव्हा तहान लागते. निरोगी राहण्यासाठी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पाणी पिणे महत्त्वाचे आहे. पाणी कधी, किती आणि कसे प्यावे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हिवाळ्यात कमी पाणी प्यायल्याने शरीरातील डिहायड्रेशनचा धोका वाढतो. ज्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. अशा स्थितीत स्मरणशक्ती कमकुवत होण्याचा धोका असतो.

डॉक्टरांच्या मते, हिवाळ्यात ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो, ज्याची अनेक कारणे असू शकतात. त्यातील एक म्हणजे कमी पाणी पिणे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, थंड वातावरणात लोकांना कमी तहान लागते. त्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते. बर्‍याच प्रकरणांमध्ये, डिहायड्रेट राहिल्यामुळे मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे पक्षाघाताचा धोका असतो. कमी पाणी पिल्याने किडनीवर गंभीर परिणाम होतो. याशिवाय किडनी स्टोन होण्याचा धोकाही वाढतो. किडनी व्यवस्थित काम करण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा किडणीला जास्त काम करावे लागते. त्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा ट्रॅकमध्ये जळजळ होण्याची तक्रार असते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news