जगन्नाथ मंदिरात ड्रेस कोड लागू होणार

जगन्नाथ मंदिरात ड्रेस कोड लागू होणार
Published on
Updated on

भुवनेश्वर; वृत्तसंस्था : ओडिशातील जगन्नाथ मंदिराच्या प्रशासनाने भाविकांना ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षीच्या 1 जानेवारीपासून भाविक ड्रेस कोडसह मंदिरात प्रवेश करू शकतील. मंदिरातील पावित्र्य राखण्यासाठी भाविकांमध्ये जनजागृती करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

मंदिरात छोटे कपडे, फाटलेली जीन्स, स्कर्ट, स्लीव्हलेससारख्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे, पण भाविकांनी मंदिरात कोणत्या प्रकारचे कपडे घालून यावे याबाबत अद्याप काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही, पण यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे मंदिर प्रशासनाने सांगितले. जगन्नाथ मंदिर ट्रस्टचे प्रमुख रंजन कुमार दास यांनी सांगितले की, मंदिरात नेहमीच भाविक छोटे कपडे घालून दर्शन घेतात. या पार्श्वभूमीवर मंदिराच्या कार्यकारिणीने ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रेस घातल्यानंतरच भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news