पुढारी ऑनलाईन डेस्क: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट (Donald Trump's Twitter) रिस्टोअर करण्यात आले आहे. ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. यासाठी मस्क यांनी ट्विटरवर ट्रम्प यांचे अकाऊंट रिस्टोअर करायचे की नाही? असा पोल ट्विटवर टाकला होता. यामध्ये 51.8 टक्के यूजर्संनी 'हो' असे सकारात्मक उत्तर दिले. त्यामुळे ट्रम्प हे पुन्हा ट्विटरवर दिसणार आहेत.
दोन वर्षापूर्वी अमेरिका संसदेवर हल्ला झाला. यानंतर ट्विटरवर मोठ्या प्रमाणात हिंसाचाराची प्रकरणे वाढली. यामध्ये डोनाल्ट ट्रम्प देखील ओढले गेले आणि त्यांचे अकाऊंट ट्विटरकडून सस्पेंड करण्यात आले. ६ जानेवारी, २०२१ मध्ये ट्रम्प याचे अकाऊंट बंद केले होते. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ट्विटरवर दिसणार आहेत. त्यानंतर ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी सांगितले आहे की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट लवकरच रिस्टोअर केले जाणार आहे. यापूर्वी त्यांनी मे महिन्यात ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवरील बंदी उठवण्याची शक्यता वर्तवली होती.