डोंबिवली : ताडी पिऊन दोन तरुणांचा मृत्यू

File Photo
File Photo

डोंबिवली ; पुढारी वृत्तसेवा

अनधिकृत ताडी दुकानातून रात्री ९.३० वाजता ताडी पिऊन निघालेल्या दोन तरुणांना आपला प्राण गमवावा लागल्‍याची धक्‍कादायक माहिती माहिती समोर आली आहे. या घटनेचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे डोंबिवली शहरात खळबळ उडाली आहे.

डोंबिवली पश्चिम येथील कोपर परिसरातील गावदेवी मंदिराजवळ असलेल्या अनधिकृत ताडीच्या दुकानात ट्रॅफिक वॉर्डन असणारा तसेच कोपर येथील रहिवासी असणारा (२८ वर्षीय) स्वप्नील चोळके आणि कैलास नगर येथील रहिवासी असणारा (२२ वर्षांचा) सचिन पाडमुख अशा दोन मित्रांनी ताडी प्यायचा बेत केला. मात्र रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ताडी पिऊन घरी निघालेले स्वप्नील व सचिन दोघेही रस्त्यातच कोसळले. त्यांनतर या दोघांनाही शास्त्री नगरला नेले असता सचिनचे निधन झाल्याचे सांगितले. तर स्वप्नीलला खासगी रुग्णालयात दाखल करत असताना त्याचेही निधन झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

तर या गुन्ह्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, रवी बदनी असे ताडी चालकाचे नाव आहे. त्‍याच्यावर गुन्हा दाखल केला असून, सध्या तो फरार आहे. पुढील तपास विष्णू नगर पोलीस करत आहेत. यासंदर्भात आमदार रवींद्र चव्हाण यांनी दारूबंदी खात्याचे सपशेल दुर्लक्ष होतं असून ही घटना खेदजनक असल्याचे मत व्यक्त केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news