Animals Count : पशुगणनेत श्वानाचा समावेशच नाही!

Animals Count : पशुगणनेत श्वानाचा समावेशच नाही!

कागल : बा. ल. वंदूरकर : श्वान चावण्याबरोबरच धडकल्यामुळे होणार्‍या अपघातात मृत्यूचे प्रमाण अधिक निर्माण झाले असून मोकाट श्वानांच्या टोळीयुद्धामुळे निष्पाप लोकांचे जीव जात आहेत. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील श्वानांचादेखील बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. पशुधन विभागाच्या प्राणीगणनेमध्ये श्वानाचा समावेश नसल्यामुळे गावोगावी आणि शहरांमध्ये इतर प्राण्यांपेक्षा श्वानांची संख्या अधिक निर्माण झाली आहे.

मोकाट श्वानांचा प्रश्न सध्या गंभीर बनला आहे. श्वानावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने श्वानांची संख्या इतर प्राण्यांच्या तुलनेत अनेक पटींनी जादा झाली आहे. खाण्यासाठी पुरेसे अन्न मिळत नसल्याने श्वान गल्लीबोळात, शेतात भटकत असतात.

रात्रभर मोकाट श्वान एकमेकांचा पाठलाग असतात. टोळीने श्वान फिरत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला यांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. रात्रीच्या वेळी बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. रात्रपाळी करून येणारे कर्मचारी जीव धोक्यात घेऊन घरापर्यंत पोहोचत आहेत. चिकन, मटण दुकान आणि पोल्ट्री फार्म या ठिकाणी श्वानांची संख्या अधिक आढळून येत आहे. पोल्ट्री फार्ममध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने पक्षी मरत असतात. ते पक्षी आजूबाजूला पोल्ट्री मालक टाकून देत असतात; तसेच मटण आणि चिकन दुकानातील प्राण्यांचे अवयव टाकून दिलेले असतात. हे खाण्यासाठी श्वानांची पळापळ सुरू असते.

शेतात मेंढपाळ बकर्‍यांच्या पिलांवर देखील श्वान हल्ला करून त्यांचा फडशा पाडत असतात. श्वानांच्या भांडणांमध्ये लहान मुलांचा बळी जात आहे. रस्त्यावर बसलेले श्वान मोटारसायकलस्वाराचा कधी पाठलाग करतात व जीवघेणा अपघात होतो. अचानक मोटारसायकलच्या आडवे येणे, चाकात अडकणे असे प्रकार होतात.

पशुधन विभागाच्या प्राणी गणनेमध्ये श्वानाचा समावेश करण्यात आला नसल्याने शहरात आणि ग्रामीण भागात श्वानांची संख्या नक्की किती याची संख्या मिळत नाही. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही श्वानांची संख्या धोकादायक बनली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news