जगातील ‘या’ सर्वात श्रीमंत व्यक्तीबाबत ‘हे’ माहिती आहे का?

एलन मस्क
एलन मस्क

वॉशिंग्टन : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून आज एलन मस्क यांची सर्वत्र ओळख आहे. शिवाय 'टेस्ला', 'स्पेस एक्स' आणि 'ट्विटर'चे सर्वेसर्वा म्हणूनही ते जगभर ओळखले जातात. मात्र, त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी लोकांना माहिती नसतात. त्यांच्या जीवनातील अशाच काही घटनांची ही माहिती…

सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेले आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मस्क हे मूळचे दक्षिण आफ्रिकेचे आहेत. त्यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील असून वयाच्या 17 व्या वर्षापर्यंत ते दक्षिण आफ्रिकेतच होते. त्यानंतर मस्क यांचं कुटुंब कॅनडामध्ये स्थायिक झाले. त्यांनी किंग्सट क्विस विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यास सुरुवात केली. मस्क यांना 'अ‍ॅस्पर्जर्स सिंड्रोम' हा आजार आहे. हा स्वमग्नतेचा (ऑटिजम) एक प्रकार आहे. यामध्ये गोष्टींवर लक्ष्य केंद्रीत करण्यात अडचणी निर्माण होतात, सामाजिक स्तरावर संवाद साधताना अडखळणे यासारख्या समस्या असा लोकांना भेडसावतात. मस्क हे स्टॅण्डफोर्ड विद्यापीठात अवघे 2 दिवस टिकले. त्यांनी शालेय शिक्षणही अर्ध्यात सोडलं. त्यांना स्टॅण्डफोर्ड विद्यापीठातून फिजिक्समध्ये डॉक्टरेटचे शिक्षण घ्यायचं होतं.

मात्र, स्टॅण्डफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेण्याऐवजी 2 दिवसांमध्ये बाहेर पडून मस्क यांनी स्वत:ची 'झिप 2' ही स्टार्टअप कंपनी सुरू केली. त्यांनी 4 वर्षांनंतर ही कंपनी 300 मिलियन अमेरिकी डॉलर्सला विकली. मस्क हे एक्स डॉट कॉमचे सहसंस्थापक आहेत. ही एक ऑनलाईन बँक होती जी नंतर पेपल कंपनीच्या मालकीच्या एका कंपनीत विलीन झाली. ईबे या कंपनीने 2002 साली पेपल ही कंपनी 1.5 बिलिअन अमेरिकी डॉलर्सला विकत घेतली. या सर्व व्यवहारांमध्ये मस्क यांना 175 मिलियन अमेरिकी डॉलर्सचा फायदा झाला.

याच पेपलच्या व्यवहारामधून मिळालेल्या कंपनीतून त्यांनी 2022 साली स्पेस एक्स कंपनीची स्थापना केली. मार्टिन इबर्थहार्ड आणि मार्क टार्पेनिंग यांनी 2003 साली टेस्ला कंपनीची स्थापना केली. त्यानंतर मस्क यांनी एका वर्षाने या कंपनीमध्ये पैसे गुंतवले आणि नंतर तिची मालकी विकत घेतली. मस्क यांनी पहिल्या गुंतवणुकीमध्ये टेस्लामध्ये 6.35 मिलिअन अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक केली. ही गुंतवणूक त्यांनी 2004 साली केली. त्यानंतर ते कंपनीचे सीईओ झाले. 'टेस्ला' कंपनीचा वाईट काळ सुरू होता तेव्हा एलन मस्क ही कंपनी गुगलला विकणार होते.

एलन मस्क यांना एकूण 7 मुले आहेत. यापैकी 5 मुले त्याची पूर्वाश्रमीची पत्नी जस्टीनपासून आहेत. तर अन्य 2 मुले ही गायिका ग्रीमीसपासून आहेत. तसेच मस्कच्या नेव्हाडा नावाच्या मुलाचा 2002 साली मृत्यू झाला. मस्क हे मालिका आणि चित्रपटांमध्येही झळकले आहेत. ते सर्वात आधी 2010 साली 'आर्यन मॅन 2' मध्ये झळकले होते. त्यानंतर त्यांनी 'द बिग बँग थेअरी'मध्येही काम केले होते. मस्क हे कार्टून व्हर्जनमध्येही 'द सिम्पसन्स', 'साऊथ पार्क' आणि 'रिक अँड मॉर्टी'सारख्या मालिकांमध्येही झळकले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news