Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या आयुष्यातील ‘ही’ ३ मेंटाॅर माहीत आहेत का?

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या आयुष्यातील ‘ही’ ३ मेंटाॅर माहीत आहेत का?

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : "देशातील सत्तेपासून ग्रामपंचायतीपर्यंत सगळ्या सत्ता तुम्हाला पाहिजेत, मग आम्ही काय धुणीभांडी करायची काठ, असा प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली. तर "मविओमधील नेते दाऊतच्या घरी धुणीभांडी करतात, ते आधी बंद करा", असे प्रत्‍युत्तर  देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या दाेन्‍ही बातम्यांच्या केंद्रस्थानी कुख्यात डाॅन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आहे. त्याच्याबद्दल अनेक सत्य-असत्य गोष्टी आतापर्यंत मांडल्या गेल्या. पण, काही गोष्टी अजूनही पुढे आलेल्या नाहीत. त्या कोणत्या ते  आपण आज पाहणार आहोत.

खून, मारामाऱ्या, ड्रग्ज-शस्त्रांची तस्करी आणि दहशतवादी हल्ले, अशा अनेक गुन्ह्यांसाठी कुख्यात गुंड म्हणजे दाऊद इब्राहिम. त्याची 'डी-गॅंग'  आहे. लेखक हुसेन झैदी यांनी 'दाऊद्स मेंटाॅर' नावाचं पुस्तक लिहिलंय. त्यात दाऊद याला गुन्‍हेगारी विश्‍वाचे बाळकडू हे   खालिद खान पाचा याच्‍याकडून मिळाल्याचे म्‍हटलं आहे. पाचा हाच दाऊदचा पहिला मेंटाॅर हाेता.

शाळेच्या ग्राऊंडमध्ये दाऊदवर झाला  हाेता पहिला हल्ला

पुस्तकात एक प्रसंग लेखक झैदी यांनी दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि त्याचा भाऊ साबीर इब्राहिम यांच्यासोबत शाळेत घडलेल्या प्रसंगाबद्‍दल लिहिलंय की, "दाऊद हा नागपाडा जंक्शन रोड सेफ्टी पेट्रोलचं काम करत होता. याचवेळी त्याचा भाऊ साबीर याला अहमद सेलर हायस्कूलमधील बास्केटबाॅल ग्राऊंड काही मुलांनी बेदम मारले होते. भावाच्या मदतीला दाऊद धावून गेला. मात्र, दोघांनाही त्या मुलांनी बेदम मारहाण केली. त्यात दाऊत आणि साबीर यांच्या चेहऱ्यावर, अंगावर अनेक वार करण्यात आले होते.

खालिद खान पाचा दाऊदचा पहिला मेंटाॅर

खालिद खान पाचा हा मूळचा भोपाळचा. तो मुंबईत पाेलिस  होण्यासाठी आला होता. मात्र, शेवटी तो अंडरवर्ल्डचा भाग झाला. त्यानेच दाऊदला अंडरवर्ल्डचा डाॅन बनवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. झैदी लिहितात की, "खालिद खान पाचा हा 'डी-गॅंग'च्या निर्मितीमध्ये प्रमुख होता. ही गॅंग एकमेव अशी ८० च्या दशकातील मुंबईच्या क्राईमची सिंडीकेट होती.

खालिदने दाऊदला निशस्त्र असताना कसं लढायचं, हे शिकवलं. त्यालाच खालिद सर्व्हायव्हल टेक्निक म्हटलं होतं. या टेक्निकला दाऊद 'हिरो टेक्निक' म्हणतो. १९८० नागापाडा जंक्शनमध्ये दाऊद आणि साबीरवर जो मुलांचा हल्ला झाला होता. त्यात खालिदने दाऊदच्या दिशेने आलेली गोळी स्वतःच्या अंगावर घेतली होती आणि त्याचे प्राण वाचवले होते.

१९ वर्षी दाऊदने बॅंक लुटून पहिला गुन्हा केला

३) दाऊद इब्राहिमने १९७४ साली वयाच्या १९ व्या वर्षी बॅंकेवर दराेडा टाकला होता. दाऊदच्या आयुष्यातील हा पहिला गुन्हा होता. दाऊदला वाटलं होतं की, हा पैसा मस्तानचा आहे. पण, नंतर लक्षात आले की, हा पैसा 'मेट्रोपाॅलिटन बॅंके'चा होता.

शकील बाबूमियाॅं शेख दाऊदचा दुसरा गुरू

शकील बाबूमियाॅं शेख उर्फ छोटा शकील हा दाऊदचा दुसरा गुरू होता. दाऊद इब्राहिमच्या 'बी-टीम'चा महत्त्वाचा भाग होता. हा छोटा शकील अनेक खून, दरोडा, खंडणी, दहशतवादाच्या गुन्हात मुख्य गुन्हेगार होता. १९९३ साली मुंबईमध्ये जे बाॅम्बस्फोट झाले, त्यातील मुख्य आरोपी छोटा शकील आहे.

 जेनाबाईनेकडूनही दाऊदला मिळाली गुन्‍हेगारी जगताची माहिती

जेनाबाई ही दाऊदच्या आईची म्हणजे अनिमाची मैत्रिण होती. मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील इत्यंभूत माहिती देणारी पोलिसांची टीपर होती. तिनेदेखील अंडरवर्ल्डमध्ये विविध वस्तुंच्या तस्करीतून आपले नशीब आजमवले होते. पण, दाऊद खालिद खान पाचा भेटण्यापूर्वी जेनाबाईकडेच जात होता. तिच्याकडून महिती मिळत होती. पण, तिच्या संशयास्पद कृत्यांमुळे दाऊदने तिच्याकडे जाणं बंद केलं होते.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news