वीज बिल वाढतंय… ही काळजी घ्या

वीज बिल वाढतंय… ही काळजी घ्या

'आमच्या घरात विजेचा वापर खूप कमी आहे, तरी बिल मात्र जास्तच येते', 'या महिन्यात बिल जबरदस्त वाढून आले आहे' अशी वाक्ये कमी-अधिक प्रमाणात सर्वच घरांत ऐकावयास मिळतात; परंतु ग्राहक म्हणून आपण जागरूक राहिलो, तर हे बिल कमी होण्यास मदत होते. त्यासाठी आपणास काळजी घेणे आवश्यक आहे.

हे करा

  • मीटर रिडिंग घेण्यास येणार्‍या व्यक्तीचे नाव, आय डी. प्रूफ आणि रिडिंग घेतल्याच्या तारखेला त्याची सही घ्यावी.
  • पुढचे रिडिंग 30 दिवसांनंतरच घेतले जाते काय, याची खात्री करावी.
  • मुदतीत रिडिंग न घेतल्यास युनिटचा स्लॅब बदलू शकतो आणि त्यामुळे बिल वाढते.
  • अपार्टमेंटधारकांनी वॉचमनकडून या गोष्टी करून घ्याव्यात.

विजेचे दर

  • 100 युनिटपर्यंत 4 रुपये 41 पैसे प्रतियुनिट आहे.
  • 100 च्या वर 9 रुपये 64 पैसे
  • 300 च्या वर 13 रुपये 61 पैसे
  • 500 युनिटच्या वर 15 रुपये 57 पैसे

अशी होते बिल आकारणी

स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार, वीज शुल्क, थकीत बिलाच्या रकमेवर 28 टक्के व्याज, इंधन समायोजन.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news