Diwali Bonus : दिवाळी बोनस म्हणून चक्क कर्मचाऱ्यांना वाटल्या बुलेट; तामिळनाडूतील दिलदार उद्योगपती चर्चेत

Diwali Bonus
Diwali Bonus

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळीला काही दिवस शिल्लक आहेत. भारतातील नोकरदारांपासून छोटी कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वजन आपल्या बॉस, किंवा काम करत असलेल्या संस्थेकडून भेटवस्तू किंवा बोनसची वाट पाहत असतात. (Diwali bonus) अनेक कंपन्या दिवाळी हा सण उत्साहात साजरा करण्यासाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांना गिफ्ट, व्हाऊचर, मिठाई किंवा कपडे देताना दिसतात. दरम्यान, तामिळनाडूतील एका चहाचा बागयतदार (उद्योगपती) कर्मचाऱ्यांना दिलेल्या भेटवस्तूमुळे चर्चेत आला आहे. त्याने कर्मचाऱ्यांना दिवाळीभेट म्हणून चक्क बुलेट (रॉयल इनफिल्ड) गिफ्ट दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांसाठी हा आश्चर्याचा धक्का होता. (Diwali bonus)

संबंधित चहाचा बागयतदार असणारा व्यक्ती आपल्या कर्मचाऱ्यांना बुलेटच्या चाव्या देत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवकुमार असे या उद्योगपतीचे नाव आहे. ४२ वर्षीय शिवकुमार आपल्या कर्मचाऱ्यांना चाव्या दिल्यानंतर त्यांच्यासोबत बुलेटवर फिरण्यासाठी गेला होता. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी या वेळी आनंद व्यक्त केला आहे. यंदाची दिवाळी संस्मरणीय बनवल्याबद्दल त्यांनी मालकाचे आभार मानले आहेत. (Diwali bonus)

एका कर्मचाऱ्याने 'पीटीआय'शी बोलताना सांगितले की, "आम्ही अशा प्रकारच्या भेटवस्तूची अपेक्षा कधीच केली नव्हती. त्यांनी [मालक] १५ रॉयल एनफिल्ड बाईक भेट दिल्या. ज्या आम्ही पसंत केल्या आणि मला विश्वास आहे की, कोणालाही त्या मिळणार नाहीत, पण आम्हाला त्या मिळाल्या. (Diwali bonus)

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news