एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! बोनस जाहीर

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! बोनस जाहीर
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : सर्व कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी सुद्धा गोड होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना २५०० तर अधिकाऱ्यांना ५०० हजारांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. गेल्या अनेक काळापासून एसटी कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी झगडत आहेत. किमान या संघर्षमय काळात त्यांची दिवाळी गोड होणार हे निश्चित. कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी राज्यशासनाने महामंडळाकडे ४५ कोटी रुपये वर्ग केले आहेत.

एसटी महामंडळाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 45 कोटींचा निधी वितरीत करण्याची मागणी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी राज्य सरकारकडे केली होती. दिवाळी भेट म्हणून हा निधी वितरीत करण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली. त्यानुसार अर्थसंकल्पात मंजूर तरतुदीमधून 45 कोटींचा निधी वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय (जीआर) गृह विभागाने मंगळवारी जारी केला आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळी सणासाठी एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट वितरीत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news