राज्यातील जि. प. शाळांमध्ये करणार सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती

राज्यातील जि. प. शाळांमध्ये करणार सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीतून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खासगी अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी स्वरूपात तात्पुरती नियुक्ती जिल्हा परिषद शाळांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नियुक्तीची प्रक्रिया पंधरा दिवसांत पूर्ण करण्याबाबतही स्पष्ट केले आहे.

नियोजित शिक्षक भरती प्रक्रियेबाबत उच्च न्यायालयात दाखल याचिकांमुळे भरती प्रक्रियेत विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आता सेवानिवृत्त शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबतचे निर्देश शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी दिले आहेत. सेवानिवृत्त शिक्षकांच्या तात्पुरत्या नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्षे राहील. नियुक्तीसाठी शिक्षणाधिकार्‍यांबरोबर करारनामा करणे आवश्यक आहे.

नियुक्ती कालावधीत पदाचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील, शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या अटी-शर्ती मान्य असल्याचे करार पद्धतीने नियुक्त केलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवेत घेण्याबाबत किंवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही, या आशयाचे हमीपत्र घ्यावे. शिक्षक नियुक्तीची प्रक्रिया शिक्षण आयुक्तांच्या नियंत्रणाखाली पूर्ण करण्यात येणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news