नागपूर, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सुनील केदार यांना उच्च न्यायालयाकडून अखेर आज (दि.९) सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. एक लाखाच्या जातमुचलक्यावर तसेच नियमित हजेरीच्या अटीसह हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. Sunil Kedar
जेएमएफसी न्यायालयाने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 153 कोटी रुपयांच्या रोखे घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांच्यासह इतर पाच दोषींना 5 वर्षे कारावास व प्रत्येकी 12.50 लाख रुपयांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला स्थगिती व जामीन या मागणीसाठी केदार यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील केले होते. मात्र, ते फेटाळून लावल्याने केदार यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. Sunil Kedar
राज्य सरकारला यासंदर्भात 6 जानेवारीपर्यंत उच्च न्यायालयाने उत्तर मागितले होते. अतिशय विश्वासाने ठेवलेल्या सर्वसामान्य जनता, शेतकऱ्यांच्या पैशाचा हा अपहार असल्याचे सांगत राज्य सरकारने जामिनास विरोध केला होता. 22 ते 28 डिसेंबर या कालावधीत केदार अतिदक्षता विभागात प्रकृती ठीक नसल्याने दाखल होते. यानंतर त्यांना मध्यवर्ती कारागृहात जावे लागले. अखेर आज उच्च न्यायालयात केदार यांना जामीन मंजूर करण्यात आल्याने केदार यांना तसेच समर्थकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा