पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असलेली पहायला मिळते. इन्स्टाग्रामवरील तीचे चाहत्यांसोबतचे कनेक्शन अधिक जास्त घट्ट बनविण्याकरिता ती सतत काही ना काही पोस्ट करत असलेले पहायला मिळते. तिच्या आकर्षक फोटोंवर सोशल मीडियावरील युजर्स फिदा आहेत. सध्या दिशाने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिने पोस्ट केलेल्या फोटोंमधील बोल्ड लुकमध्ये भावुक चेहऱ्यात दिसून आली. ज्यामुळे ती खुप चर्चेत आली आहे.
दिशाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती ऑरेंज कलरच्या बिकिनीमध्ये दिसून येते. या लुकमध्ये ती थोडासा कमी म्हणजेच लाईट मेकअपमध्ये दिसून येत आहे. त्याचबरोबर तिने छोटे-छोटे ईयररिंग्स देखील घातलेले पहायला मिळतात. तसेच ती कॅमॅरासमोर भावूक पोज देतानाही पहायला मिळत आहे.
या लुकमुळे दिशा इतकी बोल्ड अंदाजात दिसून येत आहे ज्याचा परिणाम सोशल मीडियावरील युजर्सच्या नजरा खिळल्या आहेत. तिच्या चाहत्यांव्यतिरिक्त मोठ-मोठ्या व्यक्तींनी देखील तिच्या फोटोंवर 'खूपच हॉट' अशा कमेंट केली आहे.
दिशाची तिच्या चाहत्यांवर असणारी भुरळ ही मोठ्या प्रमाणात दिसून येते. ती सध्या चित्रपटांऐवजी तिच्या लुक्स, ड्रेसिंग सेंस आणि फिटनेसमुळे कायम चर्चेत असलेली पहायला मिळते. तिच्या आगामी चित्रपटांबाबत बोलायचं झालं तर तिला अनेक चित्रपटांकरिता ऑफर्स मिळत आहेत. दिपिका पादुकोण आणि ऋतिक रोशन यांच्या आगामी चित्रपटांमध्ये ती दिसून येईल अशी चर्चा आहे.
हेही वाचा