Disha Patani : कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीचे शूट, प्रभाससोबतचे फोटो व्हायरल

disha patani
disha patani
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिशा पटानीने आपला आगामी चित्रपट कल्कि 2898 एडी साठी कडाक्याच्या थंडीत शूट केले. प्रभाससोबत तिचे हे शूट सुरु आहे. (Disha Patani) यामध्ये ती दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चनसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट रिलीजच्या एक महिने आधी अभिनेत्रीने सोशल मीडियावर सेटवरून फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती प्रभास सोबत शूट करताना दिसत आहे. (Disha Patani)

या फोटो-व्हिडिओला दिशाने कॅप्शनमध्ये लिहिलं, "इटली फोटो डम्प. कल्कि 2898. खूप थंडी होती."

हा चित्रपट पुढील महिन्यात रिलीज होत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या शूटिंगचे फोटो व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. दिशा पटानी बी-टाऊनच्या त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जी सोशल मीडियावर आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफशी संबंधित अपडेट शेअर करते. अभिनेत्रीने इटलीच्या सुंदर क्षणांचा व्हिडिओ शेअर केला आहे.

नाग अश्विन दिग्दर्शित कल्कि 2898 एडी ९ मे रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. रिपोर्टनुसार, चित्रपटाची रिलीज डेट पोस्टपोन होऊ शकते. पण, अद्याप निर्मात्यांनी कोणतीही हिंट दिलेली नाही. चित्रपटामध्ये प्रभास, दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news