गौर गोपाल दास आणि डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यात विविध विषयांवर चर्चा

गौर गोपाल दास आणि डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यात विविध विषयांवर चर्चा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक गुरू, 'इस्कॉन'चे गौर गोपाल दास प्रभू आणि दैनिक 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. गौर गोपाल दास यांनी रविवारी डॉ. जाधव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

साध्या-सोप्या भाषेत, अवती भोवतीची उदाहरणे देत, विशेषत: तरुणांना अध्यात्म, नातेसंबंध, मानवी जीवन सहजपणे समजून सांगण्यात हातखंडा असणारे, प्रभावी वक्ते म्हणून प्रसिद्ध असलेले गौर गोपाल दास कोल्हापूर दौर्‍यावर आहेत. रविवारी सायंकाळी डॉ. जाधव यांच्याशी त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. ताण-तणाव, नाते संबंध, धर्म-अध्यात्म, इस्कॉनचा विस्तार आदी विषयांवर मनमोकळ्या गप्पा केल्या.

डॉ. जाधव यांनी जिल्ह्याच्या समृद्ध धार्मिक, आध्यात्मिक परंपरेची माहिती दिली. यावेळी दैनिक 'पुढारी' परिवाराच्या वतीने गौर गोपाल दास यांचा करवीर निवासिनी श्री अंबाबाईची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news