मृत तार्‍यांभोवती फिरणार्‍या दोन बाह्यग्रहांचा शोध

मृत तार्‍यांभोवती फिरणार्‍या दोन बाह्यग्रहांचा शोध

वॉशिंग्टनः खगोलशास्त्रज्ञांनी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या सहाय्याने दोन अशा ग्रहांचा शोध लावला आहे जे मृत तार्‍यांभोवती फिरतात. हे दोन्ही बाह्यग्रह आपापल्या अशा सफेद खुजा तार्‍यांभोवती फिरत आहेत जे यापूर्वीच मृत झाले आहेत! हा एक अनोखा शोध असल्याचे खगोलशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

या संशोधनामुळे भविष्यात सूर्याची स्थिती अशी झाली तर आपल्या ग्रहमालिकेवर कोणता परिणाम होऊ शकतो याचा विचार करण्याची संधी संशोधकांना मिळाली आहे. स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टिट्यूटमधील सुसान मुलाली यांनी याबाबतचे संशोधन केले. त्यांनी सांगितले, सफेद खुजा तार्‍यांभोवती फिरणारे अतिशय कमी ग्रह यापूर्वी शोधण्यात आले आहेत.

आता जे दोन नवे ग्रह शोधण्यात आले आहेत ते आपल्या ग्रहमालिकेतील काही ग्रहांशी बर्‍याच अंशी मिळतेजुळते आहेत. त्यामध्ये त्यांचे तापमान, वय, वस्तुमान आणि कक्षांचा समावेश होतो. ज्यावेळी एखाद्या तार्‍याचा मृत्यू होतो त्यावेळी त्याची ग्रहमालिका कशी दिसते हे पाहण्याची संधी यामुळे मिळालेली आहे. 'डब्ल्यूडी 1202-232' आणि 'डब्ल्यूडी 2105-82' या सफेद खुजा तार्‍यांभोवती हे दोन ग्रह फिरत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news