Christopher Nolan : ‘या’ दिग्दर्शकाचा प्रचंड बोलबाला! Oppenheimer चित्रपटाची इतकी चर्चा का?

Oppenheimer movie
Oppenheimer movie
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan) जगभरात आपल्या क्राईम थ्रिलर चित्रपटांसाठी ओळखले जातात. पण, त्यांच्या कहाणीची जी स्टाईल आहे, ते त्यांच्या चित्रपटांच्या दुसऱ्या क्राईम चित्रपटांपेक्षा वेगळं बनवतो. ख्रिस्तोफरच्या कहाण्या उत्साहवर्धक असतात. द डार्क नाईट ट्रिलॉजी, इन्सेप्शन आणि टेनेट यासारख्या चित्रपटांनंतर ख्रिस्तोफर यांचा पुढील चित्रपट ओपेनहायमर आहे. (Oppenheimer) हा चित्रपट २१ जुलै रोजी प्रदर्शित होईल.या चित्रपटाची चर्चा संपूर्ण जगभरात होत आहे. कारण आहे या चित्रपटाचा विषय. ख्रिस्तोफर यावेळी अणूबॉम्बची निर्मिती करणारे शास्त्रज्ञ रॉबर्ट ओपेनहायमरची कहाणी घेऊन येत आहे. (Christopher Nolan)

director christopher nolan
director christopher nolan

ओपेनहायमरची कहाणी आहे तरी काय?

ओपनहायमरची कहाणी त्यांची बायोग्राफी अमेरिकन प्रोमेथियस (American Promatheus) मधून घेण्यात आलीय. जे काय बर्ड आणि मार्टिन जे शेरविनने लिहिलं होतं. रॉबर्ट ओपेनहायमर अमेरिकेचे थियोरेटिकल फिजिसिस्ट होते, ज्यांनी पहिले न्युक्लियर शस्त्रे बनवणाऱ्या टीममध्ये होते.

यास मॅनहट्टन प्रोजेक्ट असं नाव देण्यात आलं होतं. यानंतर जगभरात ॲटॉमिक एज (आण्विक युग) सुरू झालं होतं. ओपेनहायमरमध्ये याच प्रोजेक्ट आणि रॉबर्टची कहाणी दर्शवण्यात आलीय.

दुसरे महायुद्ध जिंकण्यासाठी देश अनेक नवे आण्विक शस्त्रास्त्रे शोधत होते. या क्रमात आण्विक शस्त्रास्त्रे बनवण्याची स्पर्धा लागली होती. सर्वात अधिक धोका जर्मनीपासून होता. पण बाजी मारली अमेरिकेने आणि बाजी पलटली थियोरेटिकल फिजिसिस्ट रॉबर्ट ओपेनहायमरने, ज्यांना अमेरिकी आण्विक कार्यक्रमाचे पिता असे म्हटले जाते.

ओपनहायमरमधील कलाकार

ख्रिस्तोफर नोलनने ओपेनहायमरमध्ये विविध भूमिका साकारण्यासाठी हॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांना घेतले आहे. मुख्य भूमिकेत किलियन मर्फी आहे. किलियन मर्फी पीकी ब्लाईंडर्स सीरीजमध्ये अभिनय केला होता.

आयएमडीबीच्या बीटीएस सेशनमध्ये या चित्रपटाबाबत म्हटले आहे-"ओपेनहायमर गंभीर आहे आणि याची कहाणी खूप सहजसोप्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. उत्तम अभिनेत्री एमिली ब्लंट ओपेनहायमरची पत्नी किटीच्या भूमिकेत आहे. एमिलीने चित्रपटाविषयी म्हटलं की-"हा एक चित्रपट नाही. हा एक अनुभव आहे."

चित्रपटामध्ये अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ जीन टॅटलॉकची भूमिका अभिनेत्री फ्लोरेंस पघ साकारत आहे. रॉबर्ट डाउनी ज्युनियर चित्रपटामध्ये महान फिलेंथ्रोपिस्ट लुईस स्ट्रॉसच्या भूमिकेत आहे. त्यांनी चित्रपटाला मोठ्या पडद्यावर पाहण्याचे आवाहन केले आहे.
मॅट डेमन युनायटेड स्टेट्स आर्मी कोर्प्स ऑफ इंजीनिअर्सचे तत्कालीन लेफ्टिनेंट जनरल लेसली रिचर्ड ग्रोव्स ज्युनियरच्या भूमिकेत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news