Brahmāstra : ‘या’ चार दिवसांत ब्रह्मास्त्र १०० रुपयात पाहता येणार

Brahmāstra : ‘या’ चार दिवसांत ब्रह्मास्त्र १०० रुपयात पाहता येणार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरचा 'ब्रह्मास्त्र' ( Brahmāstra ) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण २४६.६३ कोटींची कमाई केली.  दर दिवशी चित्रपटाच्या कमाई वाढ होत असल्याने दिग्दर्शकाने चाहत्यांसाठी एक खुशखबर दिली आहे. नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचे दिगदर्शक अयान मुखर्जी यांनी तिकीट दराबाबत मोठी घोषणा केली आहे.

दिगदर्शक अयान मुखर्जी यांनी त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही खुशखबर दिली आहे. यात त्यांनी नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे, सोमवार (दि. २६ सप्टेंबर )ते गुरुवार ( दि. २९ सप्टेंबर) पर्यत चित्रपटाचा तिकिट दर १०० रुपये करण्यात आला असल्याचे म्‍हटलं आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी 'नवरात्री ब्रह्मास्त्र विशेष' असे लिहिले आहे.

मुखर्जी यांनी सांगितले की, "गेल्या २३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त चित्रपटाचे तिकीट दर ७५ रुपये असल्याने 'ब्रह्मास्त्र' पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मल्टिप्लेक्सबाहेर लोकांची लांबच- लांब रांग दिसत होती. यावेळचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते." 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाने शुक्रवारी (दि.२३) रोजी एकाच दिवशी चित्रपटाने एकूण १०. ७९ कोटींची कमाई केली होती.

हेही वाचलंत का? 

(video : ayan_mukerji instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news