नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेस संबंधी केलेल्या व्यक्तव्याचा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला. पंतप्रधान होण्यापासून कॉंग्रेसने रोखले म्हणून तुम्ही शरद पवारांचा पक्ष फोडला का? असा सवाल राऊत यांनी बुधवारी (दि. ९) मोदींना केला. शरद पवारांविषयी एवढा आदर आहे म्हणून पक्ष फोडलात का?", असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शरद पवार आणि काँग्रेस हे त्यांचे वेगळे राजकारण आहे. मुळात लालकृष्ण अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून पंतप्रधानांनी रोखले, किंवा त्यांना संघात घ्यायला लावले. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. शरद पवार आणि काँग्रेस हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असे राऊतांनी स्पष्ट केले.
२०१४ मध्ये तत्कालीन भाजप नेते एकनाथ शिंदे यांनी फोन करून उद्धव ठाकरे यांना युती तुटल्याचे अधिकृतपणे सांगितले होते,हे देशाने बघितल्याचेही राउत म्हणाले.सामनातील भूमिका या शिवसेनेच्या अधिकृत भूमिका आहेत.पंतप्रधांनाना सामनावर आणि शिवेसनेच्या भूमिकेवर चर्चा करावी लागते. कारण आम्ही ओरिजिनल आहोत.तुम्हाला याची दखल घ्यावी लागते कारण उद्धव ठाकरेंच्या भूमिका मान्य आहेत. कितीही हल्ले केले तरी सामना आणि शिवसेना शरण जात नाही, ही त्यांची वेदना त्यांनी बोलून दाखवली.ते नेहमीच सामना वाचतात आणि सामनाची दखल घेतात आणि सहकाऱ्यांनाही सांगतात की सामना माझ्यावर टीका करते, असेही संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा