[web_stories title="false" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="See More Web Stories" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="ASC" orderby="post_date" view="circles" /]
पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (suhana khan) नेहमीच चर्चेत असते. आता तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांना सुहानाने शिवीगाळ केल्याचा भास होत आहे. वास्तविक ही क्लिप मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील आहे. रविवारी (दि. 16) सुहाना या सामन्यात तिचे वडील शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्सला सपोर्ट करण्यासाठी आली होती. इशान किशन बाद झाल्यानंतर सुहानाची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. यानंतर चाहत्यांना शाहरुख खानच्या वानखेडे वादाची आठवण होत आहे.
सुहाना खानने (suhana khan) मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. एका प्रसिद्ध मेकअप ब्रँडचा चेहरा म्हणून तिची निवड करण्यात आली आहे. तसेच ती लवकरच 'द आर्चीज' या चित्रपटातून चंदेरी दुनियेत प्रदार्पण करणार आहे. सध्या सुहाना आयपीएलमध्ये आपली छाप पाडत आहे. केकेआरच्या प्रत्येक सामन्यांत ती आपल्या संघाला चिअर करण्यासाठी उपस्थित असते.
रविवारी वानखेडे स्टेडियममध्ये केकेआरचा मुंबई विरूद्ध सामना रंगला होता. या सामन्यादरम्यान सुहाना मैदानात आली होती. केकेआरने पहिला फलंदाजी करून मुंबई इंडियन्ससमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली. पण यजमान संघाने इशान किशन, सूर्यकुमार यादव यांच्या फटकेबाजीच्या जोरावर हा सामना जिंकला. पराभव पत्करावा लागल्याने सुहाना नाराज दिसली. सामन्या दरम्यान तर तिने मुंबईचा सलामीवीर फलंदाज इशान किशनला उद्देशून काहीतरी पुटपुटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
क्लिपमध्ये सुहाना (suhana khan) तिचा लहान भाऊ अबरामसोबत काहीतरी खाताना दिसत आहे. ईशान बाद झाल्यानंतर ती काहीतरी बोलते. लिप सिंकवरून लोक अंदाज लावत आहेत की तिने शिवीगाळ केली. ईशानने 21 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. मुंबई इंडियन्सच्या विजयात त्याचा मोलाचा वाटा उचलला.
या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करत आहेत. अनेक युजर्सनी सुहानाचे समर्थन केले आहे. तर सुहानाला शिवीगाळ करत काहींनी नकारात्मक कमेंटही केल्या आहेत. एकाने म्हटलंय की, इशान किशन ज्या प्रकारे गोलंदाजांची धुलाई करत होता, ते पाहून केआरकेच्या समर्थकांना शिवीगाळ करण्यावाचून पर्याय राहिला नाही. दुसरा एक युजर म्हणतो की, सामना पाहताना कोण शिव्या देत नाही, असे म्हणत सुहानाची पाठराखण केली आहे. त्याचवेळी अनेकांनी शाहरुख खानचा वानखेडे वादाचे स्मरण करून दिले आहे.
2012 मध्ये शाहरुख खानचा वानखेडे स्टेडियमच्या अधिकाऱ्यांसोबत वाद झाला होता. आयपीएल सामन्यानंतर शाहरुख खानची सुरक्षा रक्षकांशी झटापट झाली. सुरक्षा रक्षकांशी सुहानाला धक्काबुक्की केल्याचा आरोप किंग खानने केला होता. या वादानंतर शाहरुख खानवर वानखेडेवर 5 वर्षांची बंदी घालण्यात आली होती.