Diabetes : आता आवाजावरूनही मधुमेहाचे निदान?

Diabetes
Diabetes
Published on
Updated on

वॉशिंग्टन : एखाद्या रोगाचे वेळीच निदान झाले की उपचाराला योग्य दिशा मिळते व वेळीच उपचार झाल्याने रोगावर नियंत्रण मिळवणे सोपे होते. त्यामुळे विविध आजारांचे वेळीच निदान करण्यासाठी नवे नवे संशोधन सातत्याने होत असते. सध्याचा जमाना 'एआय' म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. एखाद्या व्यक्तीला मधुमेह विकार झाला आहे किंवा नाही, हे निदान करणे आता कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अधिक सोपे झाले आहे. या नव्या संशोधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे एक 'टूल' मानवी आवाजात होणार्‍या सूक्ष्म परिवर्तनाची नोंद करून संबंधित व्यक्ती मधुमेहग्रस्त आहे किंवा नाही याबाबत निदान करणार आहे.

या टूलची अचूकता महिलांमध्ये 88 टक्के, तर पुरुषांमध्ये 86 टक्के आहे. या संशोधनासाठी 267 व्यक्तींच्या आवाजाचे विश्लेषण करण्यात आले. अमेरिकेतील 'क्लिक लॅब'च्या संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मॉडेल तयार करण्यासाठी वय, उंची आणि वजन यासह आरोग्याच्या माहितीचे विश्लेषण केले. त्यानंतर या व्यक्तींच्या सहा ते 10 सेकंदांच्या आवाजाच्या नमुन्याचा अभ्यास केला.

संशोधकांनी सांगितले की, 267 व्यक्तींना दोन आठवडे दररोज सहावेळा त्यांचा आवाज मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यास सांगितले होते. त्यानंतर 18 हजारांपेक्षा अधिक रेकॉर्डिंगच्या मदतीने मधुमेह न झालेली व्यक्ती आणि टाईप 2 प्रकारचा मधुमेह झालेल्या व्यक्तींमधील बदलांची माहिती मिळाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news