धुळे : शिरपूरच्या धरण क्षेत्रात दीड कोटी रुपयांच्या गांजाची शेती उघडकीस

धुळे : शिरपूरच्या धरण क्षेत्रात दीड कोटी रुपयांच्या गांजाची शेती उघडकीस

धुळे : पुढारी वृत्तसेवा

शिरपूर तालुक्यातील रेकलियापाणी धरण परिसरात सुमारे दोन ते तीन एकर क्षेत्रात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर कारवाई केली असता या भागात मोठ्या प्रमाणावर गांजाची शेती असल्याची बाब उघडकीस आली. या गांजाची किंमत सुमारे दीड कोटी रुपयां पर्यंत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो आहे.

शिरपूर तालुक्यात लाकड्या हनुमान पाड्या नजीक असलेल्या रेकलियापाणी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे तसेच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दोन्ही पथक घटनास्थळी पोहोचले. या पथकांनी पाहणी केली असता सुमारे दोन ते तीन एकर क्षेत्रात गांजाची लागवड केल्याची बाब उघडकीस आली. विशेषता झोपडी नजीक सुमारे 120 किलो सुका गांजा देखील आढळून आला. त्यामुळे या परिसरात गांजाची शेती गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या कारवाईदरम्यान पोलीस अधीक्षक धिवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन या गांजाच्या शेतीची पाहणी केली. या गांजाच्या रोपांची वजन करून किंमत ठरवण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते त्याचप्रमाणे गांजाची शेती करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या गांजाची किंमत बाजारात सुमारे दीड कोटी रुपयांपर्यंत असल्याचा प्राथमिक अंदाज असून ही रक्कम आणखी वाढण्याचा शक्यता आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news