Dhule | पिंपळनेर ग्रामपंचायतीसह साक्री तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींवर प्रशासक

Dhule | पिंपळनेर ग्रामपंचायतीसह साक्री तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींवर प्रशासक

पिंपळनेर, जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर येथील ग्रामपंचायतीसह साक्री तालुक्यातील तब्बल 30 ग्रामपंचायतींवर ग्रामपंचायत प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. याबाबतचे पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी नुकतेच प्रसिद्ध केले. ग्रामपंचायत प्रशासक म्हणून संबंधितांची नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली आहे.

गुरुवार, दि. 8 फेब्रुवारी 2024 रोजी पिंपळनेर ग्रामपंचायतची मुदत संपल्यानंतर आता प्रशासनाकडून ग्रामपंचायत प्रशासक म्हणून ए.पी.महाले (विस्तार अधिकारी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सोमवार, दि.12 रोजी महाले यांना आदेश मिळताच ते पिंपळनेर ग्रामपंचायतीच्या प्रशासक म्हणून पदभार स्विकारणार असल्याचे बोलले जात आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत जिल्ह्यातील धुळे 24, साक्री 30, शिरपूर 19 व शिंदखेडा 23 अशा मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित अशा एकूण 96 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

साक्री तालुक्यातील एकूण 30 ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्ती होत आहेत. दापुर-धंगाई, सुरपान, काकशेवड, हट्टी बु., पिंपळनेर, पेजपूर, अष्टाणे, पारगांव, रूनमळी, आयने, कोकले, आमखेल, लघडवाड, अक्कलपाडा, लोणखेडे, उंभरे, उंभर्टी, बोपखेल, नवडणे, म्हसाळे, चिंचखेडे, काळगांव, कळंभिर, मैंदाणे, नांदवन, फोफरे, आमळी, इंदवे, बल्हाणे, मळगांव प्र.वॉर्सा या ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश राहणार आहे. साक्री तालुक्यातील या 30 ग्रामपंचायतींवर ए.पी.महाले, एच.डी.महंत, जे.पी.खाडे, पी.जे.मोरे, शशिकांत ठाकरे, वाय.डी.सोनवणे, डी.एम. तमखाने यांची वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news