Dhanteras 2023 : धनत्रयोदशी : संपत्ती देवतेच्या पूजेचा दिवस

Dhanteras 2023 : धनत्रयोदशी : संपत्ती देवतेच्या पूजेचा दिवस
Published on
Updated on

धनत्रयोदशी हा दिवस दीप, ज्ञान आणि लौकिक संपत्तीच्या देवता यांच्या पूजेचा दिवस. प्राचीन कथेनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी जो दीपदान करेल त्याला अपमृत्यू येणार नाही, असा आशीर्वाद यमदेवतेने हंस आणि हेम या दोन राजांना आणि यमदुतांना दिला, असा संदर्भ मिळतो. याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की, मृत्यू अटळ आहे; पण दीपदान करून म्हणजे प्रकाशक ज्ञानाच्या उपासनेने, उपकारक कामे करून मृत्यूचे भय तरी मनातून कमी करू शकतो. (Dhanteras 2023)

गोधनाचे महत्त्व सांगणार्‍या आणि कौतुक करणार्‍या वसुबारसेपासून दिवाळीच्या सुंदर उत्सवाला सुरुवात झालेली आहे. सुखद थंडीची छटा वातावरणात जाणवत असते. उत्सव या शब्दात कोणत्याही सणावाराचा अपेक्षित अर्थ लपलेला आहे. माणसाने कालच्यापेक्षा आज मनाने, बुद्धीने आणि कृतीने जास्त उन्नत, समाजास कल्याणकारक होणे म्हणजे उत्सव साजरा करणे होय, असा मूळ अर्थ आहे. उत्सवात वैचारिक, सामाजिक, पर्यावरणीय आणि बेसुमार फटाक्यांनी होणारे ध्वनीचे आणि हवेचे प्रदूषण असे कोणतेही प्रदूषण कधीच सांगितले गेले नव्हते. दुर्दैवाने आज विशेषतः शहरी संस्कृतीत निर्बंधमुक्त म्हणताना सणवार बेजबाबदारपणाकडे गेलेले दिसतात.

मुख्य मुद्दा हा आहे की, एकंदर दीपावली हा सण पितरे आणि कृषी संस्कृती याबद्दल आदर व्यक्त करण्याचा सण आहे. त्यास व्यक्तिगत आणि सामाजिक पदर होते आणि आहेत. धनत्रयोदशी हा दिवस दीप, ज्ञान आणि लौकिक संपत्तीच्या देवता यांच्या पूजेचा दिवस. प्राचीन कथेनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी जो दीपदान करेल त्याला अपमृत्यू येणार नाही, असा आशीर्वाद यमदेवतेने हंस आणि हेम या दोन राजांना आणि यमदुतांना दिला, असा संदर्भ मिळतो. याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की, मृत्यू अटळ आहे; पण दीपदान करून म्हणजे प्रकाशक ज्ञानाच्या उपासनेने, उपकारक कामे करून मृत्यूचे भय तरी मनातून कमी करू शकतो.

या दिवशी घरातील सोने-नाणे स्वच्छ करतात. उंच जागी तेलाचे दिवे लावतात. विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यानिशी या देवांची पूजा करतात. या देवांची पूजा का बरे करायची? विष्णू म्हणजे लोकपाल, लौकिक संपत्तीची स्थिती नीट राखावी लागते, हे कळावे म्हणून. लक्ष्मी ही विष्णुपत्नी. संपदेचे रूप. कुबेर ही उत्तर दिशेची मुख्य देवता, धनाचा देव. त्याचे अन्य नाव वैश्रवण होय. आपण उत्तरोत्तर प्रगती व्हावी, असे म्हणतो ना, त्यामागचे हे कारण. धर्मशास्त्रामध्ये आश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हणतात.

धनत्रयोदशीच्या तिथीला दीर्घायुष्यासाठी यमराजाला प्रसन्न करण्यासाठी दीपदान करण्यास सांगितले गेले आहे. दीपदानामुळे माणसाला अपमृत्यू येणार नाही, असे सांगितले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर, लक्ष्मी आणि विष्णू, धन्वंतरची यांचीही पूजा करण्याची प्रथा आहे.
नेपाळमधील संस्कृतीतदेखील दिवाळीचा उत्सव साजरा होतो. त्याचे स्वरूप थोडेसे निराळे असते. तोंडातून मौल्यवान रत्नांचा वर्षाव करणारे मुंगूस हातात धरलेल्या जंभल किंवा कुबेर देवतेच्या अनेक मूर्ती नेपाळमध्ये आढळतात. योगिनी या देवता पार्वतीच्या सहकारी आणि गूढ शक्तीची प्रतीके होय. बुद्धिदेवता म्हणजे गणेश. बुद्धी वापरून नीतीच्या मार्गाने संपत्ती मिळवावी, हे सांगणारी गणदेवता. जीवन, पुनर्जन्म, पुनर्निर्मिती यांचे प्रतीक म्हणजे नागदेवता. संग्रहित केलेली संपत्ती म्हणजे द्रव्यनिधी होय. या सर्वांबरोबर आयुर्वेदाची प्रवर्तक देवता असलेल्या धन्वंतरीची पूजाही केली जाते. लौकिक, आध्यात्मिक जीवन नीट जगायचे असेल, तर आरोग्याची संपदाही निरामय राखायची असते, हा मौलिक संदेश त्यातून मिळतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news