पुणे : कसब्यात भाजपाने पोलिसांना बरोबर घेऊन पैसे वाटले, रविंद्र धंगेकरांचा मोठा आरोप ; कसब्यातील राजकीय वातावरण तापलं !

पुणे : कसब्यात भाजपाने पोलिसांना बरोबर घेऊन पैसे वाटले, रविंद्र धंगेकरांचा मोठा आरोप ; कसब्यातील राजकीय वातावरण तापलं !
Published on
Updated on

पुढारी डिजीटल : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक तोंडावर असताना आता कॉंग्रेसचे  उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पक्षाने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. केवळ आरोप करून ते थांबले नाहीत तर या विरोधात उपोषणही सुरू केलं आहे.  कसबा गणपतीसमोर धंगेकर आज सकाळी 11 वाजता उपोषणाला बसले आहेत. 'मी नियम पाळतो आहे. पण समोरच्या पक्षाकडून नियम डावलून पैसे वाटले जात आहेत.

इतकेच नव्हे आमच्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रकारही घडून येतो आहे. मुळातच पोलिसांची या सगळ्याला साथ आहे. मी लोकशाहीसाठी आंदोलन करतो आहे'. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. तसेच पाच नंतर मुख्यमंत्री प्रचारात दिसत होते. त्यावेळी पोलिसांनी का कारवाई केली नाही असा सवालही त्यांनी केला आहे. या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

एकीकड धंगेकर उपोषणाला बसले तर दुसरीकडे भाजपाने दगडूशेठ मंदिरात आरतीचा घाट घातला आहे. पक्षातर्फे जारी केलेल्या निवेदनात 'विरोधी पक्षाच्या उमेदवाराने स्वतःच्या प्रचारासाठी खोटे आरोप करून उपोषण करून नागरीकांची दिशा भूल करत आहेत त्याबद्दल त्यांना बाप्पा ने सद्बुद्धी द्यावी ह्या करता दगडूशेठ गणपतीची महाआरती आयोजित केली आहे.' असे म्हटले आहे.

उद्या कसबा पेठ विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी मतदान होत आहे. कसब्यात भाजप आणि कॉँग्रेस आमने सामने आहे. भाजपचे हेमंत रासने तर कॉँग्रेसकडून रवींद्र धंगेकर रिंगणात आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news