जामखेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनु. जमाती (एस.टी. प्रवर्ग) आरक्षणासाठीचा वटहुकुम काढावा या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने ६ सप्टेंबर रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथील स्मारकास्थळी आमरण उपोषण सुरू केले आहे. जो पर्यंत वटहुकुम निघत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सुरूच रहाणार असा इशारा यशवंत सेनेचे राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले व महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील यांनी दिला आहे . दि 6 सप्टेंबर 2023 पासून तालुक्यातील चौंडी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला आ रोहित पवार यांनी दि 7 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी आंदोलना ठिकाणी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. राज्य आणि केंद्र सरकारचीही डोकेदुखी वाढणार आहे.
धनगर आरक्षण मिळण्यासाठी आम्हाला भाजपच्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहे. या केंद्र सरकारने ३७० वे कलम हटविले, राम मंदिराचा दीर्घकाळ रेंगाळलेला प्रश्न सोडविला, जे कधी सुटणार नाहीत असे वाटणारे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सोडविले आहेत. राज्यातील सरकारमध्ये भाजपला सत्ते आणण्यासाठी धनगर बांधवाचा सिंहाचा वाटा आहे.
देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यावेळी बारामतीमध्ये झालेल्या आंदोलनापुढे बोलताना फडणवीस म्हणाले होते की धनगर आरक्षणाचा माझा पूर्ण अभ्यास झालेला आहे. आमचे सरकार आले की पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रश्न मार्ग लावू. मात्र, फडणवीस यांनी पाचवर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला, आता दुसऱ्यांचा सत्ता मिळाली आहे. तरीही आमची मागणी मान्य झालेली नाही. आरक्षणाशिवाय धनगर समाजाच्या इतरही अनेक प्रश्न आहेत, तेही सोडविण्याची आमची मागणी आहे, असेही बाळासाहेब दोडतले म्हणाले.
त्यामुळे दि. 18 ते 22 सप्टेंबर 2023 या पाच दिवसाच्या संसदेच्या विशेष अधिवेशनात धनगर समाजाला अनु. जमाती मध्ये आरक्षण अमलबजावणी चा वटहुकुम काढला जावा व यासाठी महाराष्ट्र. सरकारने पाठपुरावा करावा. या मागणीसाठी आम्ही बी. के. कोकरे प्रणित यशवंत सेनेच्या वतीने दि. 6 सप्टेंबर पासुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी स्मारकास्थळी आमरण उपोषण सुरु केले आहे.
याच बरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणाचा जी आर काढुन देखील आरक्षण मिळाले नाही .आमचा मेंढपाळ समाज भटकत आसतो त्यांना व त्यांच्या मेंढपाळांना संरक्षण द्या . धनगरांच्या पोरांना ओबीसी आरक्षणाचा फायदा होत नाही त्यामुळे आमची मुले शिकत नाहीत. आम्हाला सरकार न्याय देत नाही केंद्र सरकार न्याय देत नाही मग आम्ही आमचे प्रश्न कोठे मांडायचे म्हणून आम्ही आज चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव या ठिकाणी आमरण उपोषणास बसलो आहोत. तरी आमच्या या मागणीकडे गांभीर्याने लक्षपुरवावे व धनगर समाजाला न्याय मिळवुन द्यावा अशी विनंती यशवंत सेनेचे राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले व महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील यांनी केले आहे .
आज अहिल्यादेवी होळकर यांच्या पावन भूमीत चोंडी येथे धनगर आरक्षण साठी आमरण उपोषणला सुरवात झाली. यामध्ये अहील्यादेवी होळकर यांचे मुळ वंशज अक्षय शिंदे पाटील, राज्यमंत्री बाळासाहेब दोलतडे, माणिकराव दांगडे (बारामती), आण्णासाहेब रूपनवर (माळशिरस), गोविंद नरवटे (लातुर), सुरेश बंडगर (परभणी) समाधान पाटील (जळगाव), नितीन धायगुडे (नातेपुते), किरण घालमे (इंदापुर), बाळा गायके (बिड) हे उपोषणला बसले आहेत. या वेळी चौंडी चे सरपंच सुनील उबाळे, चेअरमन विलास जगदाळे, संतोष कुरडुले, अजित उबाळे, अजित शिंदे, अतिश शिंदे, अमोल उबाळे, गणेश उबाळे या ग्रामस्थांनी पाठींबा दिला आहे. उपोषणस्थळी कर्जत जामखेड चे पोलिस उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे, जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, पो. कॉ. नवनाथ शेकडे, पो. ना. संतोष कोपनर यांनी भेट दिली.
हेही वाचा