DGCA चा एअर एएअर एशियाशियाला २० लाखांचा दंड, ‘हे’ आहेत आरोप

DGCA
DGCA

पुढारी ऑनलाइन डेस्क : नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (Directorate General of Civil Aviation – DGCA) कडून एअर एशियाला २० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड डीजीसीएच्या नियमांचे उल्लंघन केल्याने करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर एशियाचे पायलट प्राविण्य तपासणी दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळले. ते DGCA च्या नागरी विमान वाहतूक आवश्यकता नियमांचे पालन करण्यात अयशस्वी ठरले. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल डीजीसीएने एअर एशियाच्या आठ तपासकर्त्यांना प्रत्येकी तीन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

वास्तविक, तपासादरम्यान, डीजीसीएला आढळून आले की एअर एशियाचे वैमानिक काही आवश्यक सूचनांचे पालन करत नाहीत कारण त्यांना वैमानिक प्राविण्यता चाचणी दरम्यान या नियमांची माहिती दिली गेली नव्हती. यानंतर विमान कंपनीच्या प्रशिक्षण प्रमुखालाही त्यांच्या पदावरून तीन महिन्यांसाठी हटवण्यात आले आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअर एशियाचे व्यवस्थापक, प्रशिक्षण प्रमुख आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्यांना DGCA नियमांची अंमलबजावणी न केल्याची कारणे सांगण्यास सांगितले आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या उत्तरानंतरच कारवाईचा निर्णय घेण्यात येईल, असे डीजीसीएने सप्ष्ट केले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news