डोंबिवली: पुढारी वृत्तसेवा : आमदार आजारी असतानाही त्यांना मतदान करायला घेऊन येतात, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर केली होती. या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. भाजपमधील नेते राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांसारखे स्वार्थी नाहीत, असा टोला फडणवीस यांनी पवार यांना लगावला. ते डोंबिवली येथे माध्यमांशी बोलत होते.
ब्राह्मण बिझनेस नेटवर्क तर्फे डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय जागतिक बिझनेस परिषदेला फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्या हस्ते अनेक उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, ब्राह्मण समाजात मोठ्या प्रमाणत उद्योजक तयार झाले आहेत. त्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे, यासाठी या परिषदेचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.
आमदारांची तब्बेत ठिक नसतानाही त्यांना मतदान करायला आणले जाते. मग तुम्हाला काय प्रोब्लेम आहे ? असा सवाल करून आमच्याकडे असे नेते आहेत की, जे पक्षा करता स्वतःचा जीव धोक्यात घालून मतदान करायला येतात. या सर्व नेत्यांचा आम्हाला अभिमान आहे. तुमच्या पक्षासारखे केवळ स्वार्थी नेते आमच्याकडे नाहीत, असा टोला फडणवीस यांनी पवारांना लगावला.
हेही वाचा