Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज : देवेंद्र फडणवीस यांचा टाेला

File Photo
File Photo

पुढारी ऑनलाईन : आत्ता राज्यातील परिस्थिती पाहता, उद्धव ठाकरे याची मानसिक स्थिती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे, असा टाेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. मुंबई येथे माध्‍यमांशी बाेलताना त्‍यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला.

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नागपूर दौऱ्यात सत्ताधाऱ्यांना उद्देशून कलंक शब्दप्रयोग केला होता. त्यावरून सध्या राजकारण तापले आहे. भाजपमधील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शब्दप्रयोगावर ताशेरे ओढले आहेत. दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाकरेंच्या विचारांची कीव येते आहे असे म्हटले आहे.

माध्‍यमांशी बाेलताना फडणवीस म्हणाले, "उद्धव ठाकरे यांच्यावर सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विपरित परिणाम झाला आहे. अशा मानसिक स्थितीत असलेली  व्यक्ती काही तरी बोलत असेल तर त्यावर बोलणे योग्य नाही. अशा स्थितीत आपण समजून घेतले पाहिजे. त्यामुळे मला उद्धव ठाकरे माझ्‍यावर काय बाेलले यावर कोणतेही मत मांडायचे नाही; पण सध्या मानसिक स्‍थिती बरी नसल्‍याने ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्‍यावा."

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news