पुणे: बिबवेवाडीत अर्धवट विकासकामांचे त्रांगडे!

पुणे: बिबवेवाडीत अर्धवट विकासकामांचे त्रांगडे!
Published on
Updated on

बिबवेवाडी, पुढारी वृत्तसेवा: बिबवेवाडी अप्पर-सुपर भागातील विकासकामे अर्धवट असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. तत्कालीन नगरसेवकांच्या काळात काही विकासकामे अर्धवट झाले आहेत. तसेच, काही कामांमध्ये त्रुटी आहेत. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अप्परमधील पवननगर, श्रेयसनगर, अंबिकानगर, शेळकेवस्ती, सरगम चाळ, शिवनेरीनगर, महेश सोसायटीचा काही भाग या ठिकाणी महापालिकेच्या वतीने विविध विकासकामे करण्यात आली आहेत. मात्र, या कामांत त्रुटी असून, ठेकेदार मात्र बिले घेऊन पसार झाले आहेत. तर, काही कामे अर्धवट असल्याचे नागरिकांनी सांगितले.

या कामांमुळे परिसरातील विद्यार्थी, नागरिक व वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. सिमेंट काँक्रिटीकरणाची काही कामे अर्धीच झाली आहेत. अनेक ठिकाणी रस्ते कच्चे केल्यामुळे पावसामुळे ते उखडून गेले आहेत. अशा रस्त्यांवरून प्रवास करताना वाहनचालक व नागरिकांना कसरत करावी लागत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. मुख्य रस्त्याची डागडुजी केली जाते. पण, अंतर्गत भागातील खड्डे, तुटलेली झाकणे, चेंबर व साठलेले पाणी तसेच राहत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद राजहंस यांनी सांगितले.

अप्पर येथील शेळकेवस्ती, श्रेयसनगर, पवननगर, पद्मावतीनगर, खडकी वस्ती या ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाला आहे. ड्रेनेजलाइन देखील उखडली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अर्धवट कामांना जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांवर व ठेकेदारांवर प्रशासनाने कारवाई करावी; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– संजय वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते

बिबवेवाडीतील अप्पर, श्रेयसनगर, पद्मावतीनगर, शेळकेवस्ती, अप्पर डेपो परिसरात विकासकामांत काही त्रुटी राहिल्या आहेत. यामुळे रस्त्यांवरील ड्रेनेजलाइन उघडी पडली आहे. या लाइनची लवकरात लवकर दुरुस्ती केली जाईल.
– प्रकाश पवार, नगर उपअभियंता, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news