राष्‍ट्रवादीतील संघर्ष शिगेला! दाेन्‍ही गटांनी बाेलवली उद्या बैठक

राष्‍ट्रवादीतील संघर्ष शिगेला! दाेन्‍ही गटांनी बाेलवली उद्या बैठक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राष्‍ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आता दोन्‍ही गट पक्ष आपलाच असल्‍याचा दावा करत आहे. उपमुख्‍यमंत्रीपदाची शपथ घेतल्‍यानंतर अजित पवारांच्‍या हालचालींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. आता त्‍यांनी राष्ट्रवादीचे सर्व खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख आणि प्रदेश प्रतिनिधींना यांना ५ जुलै रोजी वांद्रे येथे बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. ( Ajit Pawar News ) दरम्‍यान, शरद पवारांनी त्‍याचदिवशी म्‍हणजे ५ जुलै रोजी सर्व सदस्‍यांना वाय.बी.चव्हाण सभागृहात बैठकीसाठी बोलावले आहे.

अजित पवार म्‍हणजे पक्ष नव्‍हे, असे सोमवारी (दि.४) पक्षाध्‍यक्ष शरद पवार यांनी स्‍पष्‍ट केले होते. तर पक्षाची बैठक घेणार असल्‍याचेही जाहीर केले होते. यानंतर आज अजित पवार यांनी ५ जुलै रोजी बैठक घेण्‍यात येईल, असे जाहीर केले आहे. आता उद्या (बुधवार, ५ जुलै ) अजित पवारांच्‍या बैठकीला कोण उपस्‍थित राहणार याची चर्चा रंगली आहे. तसेच या बैठकीला उपस्‍थित राहणार्‍या आमदारांचे अजित पवारांना समर्थन असल्‍याचेही स्‍पष्‍ट होणार आहे. दरम्‍यान, शरद पवारांनी त्‍याचदिवशी म्‍हणजे ५ जुलै रोजी सर्व सदस्‍यांना वाय.बी.चव्हाण सभागृहात बैठकीसाठी बोलावले आहे. दाेन्‍ही बैठका एकाच दिवशी हाेणार असल्‍याने उद्‍या दाेन्‍ही गटात किती खासदार आणि आमदार आहेत ते स्‍पष्‍ट हाेणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news