दाट धुक्यामुळे दिल्लीसह उत्तर भारतातील हवाई वाहतूक विस्कळीत

दाट धुक्यामुळे दिल्लीसह उत्तर भारतातील हवाई वाहतूक विस्कळीत

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दाट धुक्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून उत्तर भारतातील हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. या काळात दिल्ली विमानतळावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या शंभरभर विमानांची उड्डाणे लांबल्याची अथवा विमाने अन्य विमानतळांवर वळवावी लागली असल्याची माहिती दिल्ली विमानतळ प्रशासनाकडून बुधवारी देण्यात आली.

थंडीच्या कडाक्याबरोबरच दाट धुक्यामुळे उत्तर भारतातील जनजीवन प्रभावित झालेले आहे. नाताळ तसेच वर्षाखेरमुळे विमानतळावर गर्दी आहे. मात्र विमानांची उड्डाणे लांबल्याने प्रवासी त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. सोमवार ते बुधवार असे सलग तीन दिवस हवाई वाहतूक विस्कळीत झाली होती. काही विमान कंपन्यांनी कॅट – 3 प्रणाली वापरण्यास सुरुवात केलेली नाही, त्याचाही परिणाम विमानांच्या आगमन आणि प्रस्थांनावर झालेला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news