अबब…कोल्हापुरात पोलिसाकडून तब्बल एक कोटीच्या लाचेची मागणी; पोलीस दलात खळबळ

Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पुणे येथील महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरण खंडपीठ येथे दाखल दाव्यांचा निकाल आपल्या बाजूने करून देतो, असे सांगून पुण्यातील वयोवृद्ध शेतकऱ्याकडे तब्बल एक कोटीच्या लाचेची मागणी करणाऱ्या कोल्हापूर पोलीस मुख्यालयातील कॉन्स्टेबल जॉन वसंत तिवडे (वय 40, रा. कोरोची, ता. हातकणंगले ) याच्यावर शनिवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लाचेसाठी एक कोटीची पोलिसांकडून मागणी झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संशयित जॉन तिवडेला लवकरच अटक करण्यात येईल, असे लाचलुचपत प्रतिबंध पथकाचे पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले. संशयित तेवढे याच्याविरुद्ध यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात त्याला पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे, असेही ते म्हणाले.

तुम्ही मला समक्ष भेटा अथवा संपर्कात रहा…

हवेली तालुक्यातील देहूगाव येथील ७० वर्षीय शेतकऱ्यांच्या जमिनीसंदर्भात पुणे येथील महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण खंडपीठ येथे तीन दावे दाखल झाले आहेत त्याची सुनावणीही सुरू आहे. फेब्रुवारी 2022 रोजी अनोळखी व्यक्तीचा देहूगाव येथील तक्रार शेतकऱ्याला मोबाईलवरून फोन आला तुमच्याशी काही गोष्टीवर महत्त्वाचे बोलायचे आहे. तुम्ही मला समक्ष भेटा अथवा संपर्कात रहा, असे सांगण्यात आले. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याने फोनवर संभाषण साधनाऱ्या व्यक्तीशी सतत संपर्क ठेवला संबंधित व्यक्तीने शेतकऱ्याला कोल्हापूर येथील बसस्थानक परिसर येथे येण्यास सांगितले.

त्यानुसार दिनांक 22 मार्च 2022 रोजी शेतकरी कोल्हापूर येथे आला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येऊन संपर्क साधला असता अनोळखी व्यक्ती पोलीस कर्मचारी असल्याचे समजले. त्यानंतर त्याच दिवशी तक्रारदार व्यक्ती व पोलीस यांची मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. तेथे जॉन तिवडे याने स्वतःची ओळख करून देत आपण पोलीस असल्याचे आणि महसूल खात्यातील बहुतांश वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपले चांगले संबंध असल्याचे सांगितले.

थेट एक काेटीचीच मागणी

पुणे येथील महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण खंडपीठ येथे आपल्या जमिनीबाबत तीन दावे दाखल आहेत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपले ओळखीचे संबंध असल्याने प्रलंबित खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लावून देऊ शकतो असे सांगून तुमच्या विरुद्ध असलेल्या पार्टीने आपणाला एक कोटी रुपयांची ऑफर दिली आहे.  आपल्या बाजूने निकाल लावण्यासाठी आपण किती देणार बोला,  असा सवाल करून त्याने एक कोटी रुपयांची मागणी केली.

लाचेच्या मागणीची पडताळणी, कॉन्स्टेबल जॉन तिवडे निलंबित

तक्रारदार व्यक्तीने घरच्या मंडळींशी चर्चा करून आपणाला सांगतो, असे सांगून तक्रार व्यक्ती तेथून निघून गेली त्यांनी सरळ लाचलुचपत प्रतिबंध पथकाचे पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्याशी संपर्क करून पोलीस कॉन्स्टेबल जॉन तिवडे याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केलीतक्रारदार व्यक्तीने आठवड्यापूर्वी पोलीस उपाधीक्षक बुधवले यांच्याशी पुन्हा संपर्क साधला लाचलुचपत प्रतिबंध पथकाने एक कोटीच्या करण्यात आलेल्या लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता जॉन तिवडे याने पैशाची मागणी केल्याचे चौकशी निष्पन्न झाल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल तिवडे याच्यावर काही दिवसापूर्वी गुन्हा दाखल झाल्याने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी त्याच्यावर निलंबनाची ही कारवाई केली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news