DC vs RCB : दिल्लीचा आरसीबीवर दणदणीत विजय, ७ विकेट्सने उडवला धुव्वा

DC vs RCB : दिल्लीचा आरसीबीवर दणदणीत विजय, ७ विकेट्सने उडवला धुव्वा

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिलीप साल्टची ८७ धावांची खेळी आणि मिचेल मार्शच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीवर दणदणीत विजय मिळवला. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला होता. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या आरसीबीने दिल्लीसमोर १८२ धावांचे आव्हान ठेवले. आरसीबीचे १८२ धावांचे आव्हान दिल्लीने १६.४ षटकांमध्ये सहजरित्या गाठले.

दिल्लीकडून फिलीप साल्टने ४५ चेंडूमध्ये ८७ धावा, मिचेल मार्श १७ चेंडूमध्ये २६ धावा, डेव्हिड वॉर्नर १४ चेंडूमध्ये २२ धावा आणि रिले रुसोने २२ चेंडमध्ये ३५ धावांचे योगदान दिले आणि सामन्यात सहजरित्या विजय मिळवला. आरसीबीकडून जोश हेजलवुड, हर्षल पटेल आणि करन शर्माने प्रत्येकी १ विकेट पटकावली.

तत्पूर्वी, विराट कोहली आणि महिपाल लोमरोरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आरसीबीला १८० धावांचा टप्पा गाठता आला. आरसीबीकडून विराट कोहली ४६ चेंडूमध्ये ५५ धावा, फॅफ डू प्लेसीस ३२ चेंडूमध्ये ४५ धावा, महिपाल लोमरोर २९ चेंडूमध्ये ५४ धावा आणि दिनेश कार्तिककडून ९ चेंडूमध्ये ११ धावांचे योगदान दिले. दिल्ली कॅपिटल्सकडून मिचेल मार्शने २ तर मुकेश कुमार आणि खलील अहमदने प्रत्येकी १ विकेट पटकावली.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ – डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलीप साल्ट (यष्टीरक्षक), मिचेल मार्श, रिले रुसो, मनीश पांडे, अमन हकीम खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – विराट कोहली, फॅफ डू प्लेसीस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), केदार जाधव, वहिंदू हसरंगा, करन शर्मा, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड

हेही वाचंलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news