पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आप नेते मनीष सिसोदियांना दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याचील मनी लॉड्रिंग प्रकरणात दोषी म्हणून ईडीने अटक केली आहे. दरम्यान त्यांनी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाकडे अंतरिम जामीनासाठी अर्ज केला होता. यामध्ये आगामी लोकसभा निवडणूकीत पक्षाचा प्रचार करण्यासाठी जामीन पाहिजे असल्याचे त्यांनी म्हटले होते. कोर्टाने या याचिकेवर निर्णय देण्यापूर्वीच सिसोदिया यांनी आपली प्रचारासाठीची याचिका मागे घेतली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Delhi liquor scam)
मनीष सिसोदिया यांच्या नियमित जामीन अर्जाला सीबीआयने विरोध केला आहे. त्याला या प्रकरणात मास्टरमाईंड म्हटल्याने त्याला जामीन देऊ नये, असे सीबीआयने न्यायालयात युक्तिवाद करताना म्हटले होते. दरम्यान दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित सीबीआय आणि ईडी प्रकरणांमध्ये नियमित जामीन मागणाऱ्या मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर राऊस अव्हेन्यू न्यायालयात आज सुनावणी झाली. दरम्यान विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या न्यायालयाने मनीष सिसोदिया यांच्या नियमित जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालय 30 एप्रिल रोजी आदेश सुनावणार आहे. (Delhi liquor scam)
हेही वाचा: