Delhi : एल. जी. अनिल बैजल यांचा नायब राज्यपालपदाचा राजीनामा

Delhi : एल. जी. अनिल बैजल यांचा नायब राज्यपालपदाचा राजीनामा

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनिल बैजल यांनी बुधवारी दिल्लीच्या (Delhi ) नायब राज्यपालपदाचा राजीनामा दिला. वैयक्तिक कारणास्तव त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द केल्याचे सूत्रांनी सांगितले.

याआधीचे नजीब जंग यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर 31 डिसेंबर 2016 रोजी अनिल बैजल यांनी दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला. अनिल बैजल यांनी ३१ डिसेंबर २०२१ रोजी पाच वर्षे पूर्ण केली. पण दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नर पदासाठी कोणताही निश्चित कार्यकाळ नसल्याने ते अजून पदावर होते.

कोण आहेत अनिल बैजल ?

  • ते केंद्रशासित प्रदेश संवर्गातील 1969 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत.
  • यापूर्वी, त्यांनी दिल्ली विकास प्राधिकरण (DDA) चे उपाध्यक्षपद भूषवले.
  • त्याचबरोबर प्रसार भारती आणि इंडियन एअरलाइन्स सारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news