Kanjhawala death case :’कांजवाला’ प्रकरणी धक्कादायक खुलासा…दुर्घटनेवेळी दुचाकीवर होती आणखी एक युवती!
पुढारी ऑलाईन डेस्क : राजधानी दिल्लीसह देशाला हादरवून सोडणार्या कांजवाला अपघात प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला कारने दुचाकीवरील युवतीला धडक देत दिला १३ किलोमीटरपर्यंत ओढत नेले होते. अपघातावेळी तरुणीसोबत दुचाकीवर आणखी एक तरुणी होती, असा खळबळजनक खुलासा दिल्ली पोलिसांनी केला आहे. ( Kanjhawala death case )
याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सांगितले की, " सुलतानपूर येथील कांजवाला परिसरात अपघातात ठार झालेल्या तरुणीने प्रवास केलेल्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यामध्ये अपघातग्रस्त तरुणीबरोबर आणखी एक युवती असल्याचे निदर्शनास आले. कारने धडक दिल्यानंतर मागे बसलेली तरुणीला किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर किरकोळ दुखापत झालेली तरुणी आपल्या घरी गेली. मात्र कारच्या धडक दिल्यानंतर दुचाकी चालवत असणार्या तरुणीचा पाय कारमध्ये अडकला. आरोपींनी तिला. १३ किलोमीटरपर्यंत फरपटत नेले होते. अपघातावेळी तरुणीसोबत असणार्या युवतीचा पोलिसांनी शोध घेतला आहे."
संबंधित तरुणीचा जबाब नोंदवला
याबाबत आज ( दि. २) पत्रकार परिषदेत माहिती देताना तपास अधिकारी पोलीस अधीक्षक सागर हुड्डा यांनी सांगितले की, या प्रकरणातील मुख्य साक्षीदार ही युवतीच आहे. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला आहे. तपास अद्याप प्राथमिक टप्प्यावर आहे.
विवस्त्र अवस्थेतील मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकला
पाच आरोपींनी कांजवाला रस्त्यावरील जोंटी गावाजवळ कार थांबवली. त्यांना तरुणीचा मृतदेह कारखाली अडकल्याचा दिसला. तरुणीचा मृत्यू झाला होता. तिच्या अंगावरील सर्व कपडे फाटले होते. आरोपी तरुणांनी विवस्त्र अवस्थेतील तरुणीचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला. या प्रकरणातील आरोपी अमित आणि दीपक खूप दारू प्यायली होती. किशन विहारमध्ये त्याने स्कूटीवरून जाणाऱ्या मुलीला धडक दिली. भीतीपोटी ते घटनास्थळावरून पळून गेले होते. धडक दिल्यानंतर तरुणी कारखाली अडकल्याचे दिसले नाही, अशी कबुली आरोपींनी जबाबात दिली आहे.
गृहमंत्रालयाने घेतली गंभीर दखल, अहवाल मागवला
या भीषण अपघाताची गंभीर दखल केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अहवाल सादर करावा, असा आदेश दिला आहे. दिल्लीचे पोलिस आयुक्त संजय अरोरा यांनी विशेष पोलिस आयुक्त शालिनी सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली एक विशेष पथकाची स्थापना केली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिस लवकरच दिल्ली पोलिसांना अहवाल देणार आहेत. कारच्या चेसिसमध्ये बरेच रक्त आणि त्वचा आढळून आली होती. रोहिणी येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने (एफएसएल) आरोपीच्या कारची तपासणी केली आहे. कारच्या चेसिसमध्ये ड्रायव्हरच्या पुढील सीटपर्यंत कारच्या खाली रक्त आढळले आहे. कारखाली भरपूर रक्त सापडले आहे. एफएसएल अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी कारच्या अंडरबॉडी पार्ट्सखाली अडकली होती. कारमधून बिडी आणि सिगारेट सापडल्या आहेत, असेही पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा :
- freedom of speech | मंत्र्याच्या वक्तव्याला सरकारचे वक्तव्य म्हणू शकत नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित खटल्यावर SC चा निकाल
- Indian Science Congress : विज्ञानातून महिला व महिलांच्या सहभागातून विज्ञान सक्षमीकरण व्हावे – पंतप्रधान मोदी
- Abhimanyu Easwaran : स्वत:च्या नावाने असणार्या स्टेडियमवर खेळण्यासाठी उतरला अभिमन्यू ईश्वरन, जाणून घ्या यामागील योगायोग