Delhi Flood : PM मोदींचा फ्रान्समधून गृहमंत्री शहा यांना फोन; दिल्लीतील पुराची घेतली माहिती

Delhi Flood : PM मोदींचा फ्रान्समधून गृहमंत्री शहा यांना फोन; दिल्लीतील पुराची घेतली माहिती
पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली दि 14, Delhi Flood : सध्या फ्रान्स दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत आलेल्या पुराची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दूरध्वनी करून घेतली. मोदी यांनी उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्याशीही संवाद साधला.
यमुना नदीला आलेल्या पुरामुळे शहरातले जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे. विशेषतः नदीकाठचा परिसर मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे. पूर परिस्थिती हाताळण्यासाठी कोण-कोणते उपाय योजले जात आहेत, याची विस्तृत माहिती पंतप्रधानांनी फोनवरून घेतल्याचे सक्सेना यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.
दुसरीकडे दिल्लीत पूर आलेला असताना पंतप्रधान विदेश दौऱ्यात मग्न असल्याची टीका आम आदमी पक्षाने केली आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल मध्ये पावसाने हाहाकार उडविलेला आहे. पण पंतप्रधानांना केवळ दिल्लीची चिंता लागली आहे, असे आप कडून सांगण्यात आले.
हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news