Liquor Scam : आप खा. संजय सिंह यांच्‍या कोठडीत वाढ

Liquor Scam : आप खा. संजय सिंह यांच्‍या कोठडीत वाढ
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्‍ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अटक करण्‍यात आलेले आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह ( AAP MP Sanjay Singh ) यांना आज (दि.१०) राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले.  'ईडी'ने पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली हाेती. न्यायालयाने त्‍यांना तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

संजय सिंह यांनी लाच मागितल्‍याचे पुरावे : 'ईडी'ची न्‍यायालयात माहिती

आज 'ईडी'ने न्यायालयात सांगितले की, खासदार संजय सिंह यांनी लाच मागितल्याचे पुरावे आहेत.  दारूच्या परवान्यासाठी लाच मागितली होती. यापूर्वी संजय सिंगला अटक केल्यानंतर ईडीने त्याला न्यायालयात हजर केले होते. तेथून न्यायालयाने त्‍यांना पाच दिवसांच्या ईडी कोठडी सुनावली होती. दरम्‍यान, ईडीने विवेक त्यागी आणि सर्वेश मिश्रा यांना समन्स बजावून त्यांची चौकशी केली.

यापूर्वी दिल्‍ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने संजय सिंह यांना दहा दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, सुनावणीदरम्यान न्यायालयाने ईडीसमोर अनेक प्रश्न उपस्थित केले आणि त्यानंतर केवळ पाच दिवसांची कोठडी दिली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news