Delhi Crime : सरकारी अधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दाम्पत्याला अटक

file photo
file photo

पुढारी ऑनलाइन डेस्क : Delhi Crime : महिला आणि बालविकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मित्राच्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या गुन्ह्यात पत्नीचीही मदत झाली. दरम्यान प्रकरण उघडकीस आल्यानंतर अटक टाळण्यासाठी दाम्पत्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. घटनेमुळे संपूर्ण दिल्ली हादरले असून एकच खळबळ उडाली आहे. इंडिया टुडेने याचे वृत्त दिले आहे.

प्रेमोदय खाखा असे या आरोपीचे नाव असून पत्नीसह पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दाम्पत्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

Delhi Crime : काय आहे प्रकरण

अल्पवयीन पीडित मुलगी ही आरोपी खाखाच्या मित्राची मुलगी आहे. तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर ती 1 ऑक्टोबर 2020 पासून खाखा यांच्या कुटुंबासमवेत राहत होती. ती प्रोमोदय खाखा याला मामा म्हणत असे. प्रोमोदय खाखा हा महिला आणि बालविकास विभागात उपसंचालक या पदावर आहे. तसेच खाखा हा या पीडित मुलीचा कायदेशीर स्थानिक पालक होता.

Delhi Crime : खाखाकडून मुलीवर वारंवार बलात्कार

नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत आरोपी खाखाकडून पीडित मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यावेळी पीडित मुलीचे वय 14 वर्षे होते. आता या मुलीचे वय 17 वर्ष आहे. तर प्रेमोदयाच्या पत्नीने मुलीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचा आरोप आहे.

Delhi Crime : POCSO कायद्यांतर्गत एफआयआर दाखल

दिल्ली पोलिसांनी प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (POCSO) कायद्यांतर्गत बलात्काराच्या आरोपाखाली आरोपी आणि त्याच्या पत्नीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

Delhi Crime : अधिकाऱ्याचे निलंबन; आरोपी दाम्पत्याचा पळून जाण्याचा प्रयत्न; सीसीटीव्ही फुटेज आले समोर

या प्रकरणी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या आदेशावरून आरोपी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. दोन्ही आरोपी दाम्पत्याने अटक टाळण्यासाठी सोमवारी सकाळी पळून जाण्याचा प्रयत्न केला. आरोपी सरकारी अधिकारी वकिलाच्या संपर्कात होता. अटक टाळण्यासाठी तो न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्याच्या तयारीत होता. दरम्यान पळून जाण्याच्या तयारीत असतानाचा त्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये सोमवारी सकाळी 9.35 वाजता आरोपी निळा शर्ट घालून चालत्या कारमध्ये बसलेला दिसत आहे. पोलिसांनी हे फुटेज जप्त केले असून त्याला उत्तर दिल्ली परिसरातून अटक केली.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news