Delhi Congress: निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ ज्येष्ठ नेत्याची पक्षाला सोडचिट्ठी

Delhi Congress
Delhi Congress

पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणूक २०२४ पूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पाठवला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Delhi Congress)

दिल्लीत अद्याप लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडलेली नाही, त्यामुळे मतदानापूर्वी लवली यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडणे हे पक्षाच्या दृष्टीने मोठा धक्का मानला जात आहे. दिल्लीमध्ये काँग्रेसने केजरीवालांच्या आम आदमी पक्षाशी आघाडी केल्याने दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदर सिंग हे नाराज असल्याचे वृत्त आहे. या नाराजीतूनच त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्वत: पक्षाच्या अध्यक्षांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

दिल्ली काँग्रेस युनिट ही आम आदमी पक्षाशी युती करण्याच्या विरोधात होती. जी काँग्रेस पक्षावर खोटे, बनावट आणि चुकीचे भ्रष्टाचाराचे आरोप लावण्याच्या एकमेव आधारावर स्थापन करण्यात आली होती. असे असूनही, पक्षाने दिल्लीत 'आप'शी युती करण्याचा निर्णय घेतला…', असे अरविंदर सिंग लवली यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिले आहे.

अरविंदर सिंग लवली यांच्याविषयी…

अरविंदर सिंग लवली हे भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत. ते दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. 1998 मध्ये, ते गांधी नगर मतदारसंघातून सर्वात तरुण आमदार म्हणून दिल्ली विधानसभेवर निवडून आले. 2003, 2008 आणि 2013 मध्ये ते पुन्हा निवडून आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news