देहूरोड : पुढारी वृत्तसेवा : देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन दाखल केलेल्या राष्ट्रवादीच्या पूजा दिवटे यांनी गुरुवारी ( दि.१० ) दुपारी अर्ज माघार घेतला.
त्यामुळे अध्यक्ष पदाच्या रिंगणामध्ये स्मिता शैलेश चव्हाण ह्या एकट्याच असल्याने बिनविरोध निवड ठरणार आहे. बिनविरोध निवडणुकीची केवळ औपचारिकता बाकी आहे.
देहू नगरपंचायतीच्या अनुसूचित जाती महिला आरक्षण पदाच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या प्रभाग क्र. ९ मधील स्मिता शैलेश चव्हाण आणि प्रभाग ३ मधील पूजा अमोल दिवटे यांनी नामनिर्देशन दाखल केले होते.
गुरुवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत माघार घेण्याच्या अंतिम दिवशी दिवटे यांनी अर्ज माघार घेतल्याने चव्हाण ह्या एकटयाच उरल्या आहेत .त्यामुळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे शुक्रवारी सकाळी जाहीर होईल.
नगराध्यक्ष पदाच्या निवडी नंतर त्वरित उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी ( दि.११) सकाळी १० ते १२ या वेळेत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची वेळ आहे.
त्यानंतर त्वरित १५ मिनिटांनी अर्ज माघार घेण्याची वेळ असल्याने उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. उपाध्यक्ष पदी कोणाची निवड होणार याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे.
उपाध्यक्षपदासाठी रसिका स्वप्नील काळोखे यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण हा खरा प्रश्न आहे.
https://youtu.be/gfZJcopVz0g