Insurance Terminology : विम्यातील शब्दावलींचा अर्थ

Insurance Terminology : विम्यातील शब्दावलींचा अर्थ

Insurance Terminology : विमा पॉलिसी खरेदी करताना विम्याशी संबंधित तांत्रिक शब्दांची संपूर्णपणे माहिती मिळवणे गरजेचे आहे. ते शब्द कोणते आहेत, ते जाणून घेऊ.

पॉलिसी होल्डर : विमा खरेदी करणार्‍या व्यक्तीला पॉलिसी होल्डर किंवा विमाधारक नावाने ओळखले जाते. विमा एजंटदेखील विम्याची विक्री करताना याच शब्दाचा वारंंवार वापर करतो.

Insurance Terminology : विमाधारक : साधारणपणे पॉलिसी होल्डर हा विमा खरेदी करणार्‍या व्यक्तीला म्हटले जाते. परंतु विमाधारक व्यक्ती म्हणजे केवळ पॉलिसीधारकच नाही, तर त्याच्या कुटुंबातील व्यक्तींचादेखील यात समावेश असतो.

आर्थिक सुरक्षा : जीवन विमा पॉलिसी ही मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करते. म्हणजेच त्याच्या भविष्याला आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याचे काम करते.

Insurance Terminology : कर लाभ : जीवन विमा पॉलिसी खरेदी करणार्‍या व्यक्तीला अनेक प्रकारचा कर लाभ म्हणजेच कर सवलत मिळते. म्हणजेच जीवन विमा खरेदी केल्यानतंर प्राप्तिकरात जी सवलत मिळते, त्याला करलाभ असे म्हणतो.

चिल्ड्रन प्लॅन : कोणत्याही मुलांचे संगोपन करताना शिक्षण आणि विवाहाशी संबंधित होणार्‍या खर्चाचा त्यात समावेश केला जातो. ज्यांच्याकडे एकरकमी पैसे नाहीत ते विमा कंपनीचे चिल्ड्रन प्लॅन खरेदी करतात आणि त्या मदतीने शिक्षण आणि विवाहाचा खर्च सहजपणे उचलू शकतात.

Insurance Terminology : रिटायरमेंट प्लॅन : एखादा व्यक्ती निवृत्तीनंतरचे आयुष्य समाधानाने जगण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरते. विम्या कंपन्यांच्या रिटायरमेंट प्लॅन या वृद्धापकाळातील गरजा पूर्ण करण्याच्या द़ृष्टीने तयार केल्या जातात.

लोन अगेन्स्ट पॉलिसी : एखाद्या व्यक्तीला अचानक मोठ्या रकमेची गरज भासते. अशा वेळी विमा पॉलिसी गहान ठेवून कर्ज देण्याची सुविधा विमा कंपनीने दिली आहे. यास लोन अगेन्स्ट पॉलिसी असे म्हणतात.

Insurance Terminology : अ‍ॅडिशनल कव्हर : प्रत्येक विमा पॉलिसीवर काही कवच आपोआप मिळतात किंवा त्याचा अगोदरच समावेश झालेला असतो. परंतु आपल्याला आणखी काही जोखमीला कवच घ्यायचे असेल, तर त्यास अ‍ॅडिशनल कव्हर असे म्हणतो. जीवन विमा पॉलिसीच्या माध्यमातून दिलेले रायडर किंवा अतिरिक्त सुविधा या अपघात, अपंगत्व यासारख्या काळात आर्थिक मदत प्रदान करण्याचे काम करतात.

मॅच्योरिटी : प्रत्येक जीवन विमा योजनेच्या मॅच्योरिटीचा कालावधी असतो आणि त्यानंतर पॉलिसीधारकाला हप्ता देण्याची गरज भासत नाही. त्याचवेळी त्यांच्या जोखमीला कवच कायम राहते.

Insurance Terminology : मॅच्योरिटी बेनिफीट : जीवन विमा पॉलिसी मॅच्योअर झाल्यानंतर विमाधारकाला काही अतिरिक्त लाभ मिळतात. त्याला मॅच्योरिटी बेनिफीट असे म्हणतात.

फ्री लूक पीरियड : विमा पॉलिसी खरेदी केल्यानंतर फ्री लूक कालावधी हा पॉलिसीचे कागदपत्रे मिळाल्यानंतर पंधरा दिवसांचा असतो. या काळात काही बदल करायचे असेल तर पॉलिसीधारक त्यात बदल करू शकतो. किंवा ती पॉलिसी परतही करू शकतो. यानुसार कंपनी काही शुल्क वगळता उर्वरित रक्कम पॉलिसीधारकाच्या खात्यात जमा करते.

Insurance Terminology : सम अ‍ॅश्योर्ड : विमा कंपनीकडून विमाधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला दिल्या जाणार्‍या रकमेला सम अ‍ॅश्योर्ड असे म्हटले जाते. यास एकूण जोखीम कवच असेही म्हटले जाते.

रायडर्स : रायडर्सच्या माध्यमातून कोणत्याही विमा पॉलिसीत आणि जोखमीला जादा कवच देऊ शकतो.

Insurance Terminology : पेड अप व्हॅल्यू : एखादी पॉलिसी पेड-अप होत असेल, तर पॉलिसीधारक हप्त्याची रक्कम भरण्यास बांधील राहत नाही. याप्रमाणे कंपनी ही हप्त्याच्या प्रमाणात जोखमीची रक्कम कमी करते.

नरेंद्र क्षीरसागर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news