Hawaii wildfires | अमेरिकेच्या हवाई बेटावर अग्नितांडव! जंगलातील वणव्यात ५३ जणांचा मृत्यू, १ हजार बेपत्ता

Hawaii wildfires | अमेरिकेच्या हवाई बेटावर अग्नितांडव! जंगलातील वणव्यात ५३ जणांचा मृत्यू, १ हजार बेपत्ता
Published on
Updated on

हवाई (अमेरिका) : पुढारी ऑनलाईन, अमेरिकेच्या हवाई राज्यातील माउइच्या (island of Maui) जंगलातील वणव्याने रौद्ररुप धारण केले आहे. या भीषण आगीत आतापर्यंत ५३ लोकांचा (Maui wildfire death) होरपळून मृत्यू झाला आहे. तर १ हजार लोक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. गेल्या तीन दिवसांपासून येथे आग धुमसत आहे. यामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. (Hawaii wildfires)

या आगीतून बचाव करण्यासाठी १४ हजारांहून अधिक पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर वीज पुरवठा खंडित झाल्याने ११ हजार लोकांना याचा फटका बसला आहे. माउइच्या जंगलात लागलेल्या आगीत किमान ५३ लोकांचा मृत्यू झाला आहे, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. लाहैना या पर्यटन शहराचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी अनेक वर्षे आणि अब्जावधी डॉलर्स लागतील, असे हवाई येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.

हवाईचे गव्हर्नर जोश ग्रीन (Governor Josh Green) यांनी येथील या वणव्याला "हवाई राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती" असल्याचे म्हटले आहे. बेटाच्या पश्चिम किनार्‍यावरील पर्यटकांचे आकर्षण असलेला लाहैना या शहराचा ८० टक्के भाग उद्ध्वस्त झाला आहे आणि सुमारे १,७०० इमारती नष्ट झाल्या असल्याचे ग्रीन यांनी सांगितले. माउइच्या जंगलात आग मंगळवारी सुरू झाली आणि डोरा चक्रीवादळाच्या वाऱ्यामुळे ती वेगाने पसरली.

लाहैना येथील आग ८० आटोक्यात आली असली तरी तीन मुख्य ठिकाणच्या आगींपैकी कोणतीही आग अद्याप आटोक्यात आलेली नाही. ज्यो बायडेन प्रशासनाने या आगीच्या घटनेला "मोठ्या आपत्ती" म्हणून घोषित केले आहे. (Hawaii wildfires)

माउइच्या पश्चिम किनारी भाग आगीच्या विळख्यात सापडला असून याचा सर्वाधिक फटका लाहैना शहराला बसला आहे. येथील शेकडो घरे जळून खाक झाली आहेत.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news