दुबई : सध्या आरोग्याबाबत जागरूकता बरीच वाढली आहे. काय खावे, काय खाऊ नये, याबाबत जवळपास प्रत्येक जण दक्षता घेताना दिसून येत आहेत. उत्तम प्रकृतीसाठी ड्रायफ्रूटचा आहारातील समावेश यामुळेच वाढला आहे. यात खजुराचा Dates देखील आवर्जून समावेश होतो. मात्र, सर्वोत्तम खजूर कोणत्या देशात मिळतात याची क्वचितच माहिती असते. जगभरात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे खजूर मिळतात.
यातील अजवा खजूर Dates सर्वोत्तम मानला जातो. भारतीय रुपयांत याची किंमत 13,999 रुपये आहे. काही अजवा खजूर 3500 रुपये प्रति किलोपर्यंत उपलब्ध आहेत. या खजुरांची सर्वात खास गोष्ट म्हणजे ते फक्त सौदी अरेबियाच्या मदिना शहरात तयार केले जातात. या ठिकाणच्या विशेष हवामानामुळे अजवा खजूर फक्त मदिनामध्येच पिकतात.
या खजुरांचे Dates उत्पादन प्रामुख्याने उन्हाळ्यात होते. या अजवा खजूरच्या लागवडीची वेळ मे ते ऑक्टोबर अशी आहे. वर्षभरात एका झाडावर सुमारे 22 किलो अजवा खजूर निघतात. सौदी अरेबिया, इराण, इराक आणि दुबईसह अनेक देशांतील खजूर जगभरातील बाजारात विकले जातात. त्यांची किंमत 90 रुपये ते 4,000 रुपये प्रतिकिलो किंवा त्याहून अधिक असते. मात्र, सौदी अरेबिया आणि इराणमधील खजुरांना सर्वाधिक मागणी होत आली आहे.