कासारवाडी पुलावरील पदपथ धोकादायक; ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुलांना करावा लागतो जीव मुठीत धरून प्रवास

कासारवाडी पुलावरील पदपथ धोकादायक; ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुलांना करावा लागतो जीव मुठीत धरून प्रवास

दापोडी ः कासारवाडी-पिंपळे गुरव या रस्त्यावरील पवना नदी पुलावरील पदपथाचे सिमेंटचे ब्लॉक निखळले आहेत. त्यामुळे या पुलावरून ये-जा करणे नागरिकांसाठी धोकादायक बनले आहे.

महापालिकेच्या वतीने प्रत्येक पुलावर लाखो रुपये खर्च करून नागरिकांसाठी पदपथ बनविण्यात आले आहेत. हा पूल पिंपरी ते सांगवी, पिंपळे गुरवचा मुख्य रस्ता आहे. याच रस्त्यावरून नागरिक व वाहनचालकांची वर्दळ सुरू असते. हा जुना पूल असल्याने या पुलावरील बनविण्यात आलेल्या पदपथावरील दोन्ही बाजूंचे सिमेंट ब्लॉक निखळल्याने नागरिकांसाठी येजा धोकादायक ठरू लागली आहे.

पदपथावर चालताना मोठी दुर्घटना घडू शकते. पादचार्‍यांना पदपथावरून चालणे जिकिरीचे बनले आहे. संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या पुलावरील सिमेंटचे ब्लॉक निखळल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, दृष्टीहीन व्यक्तींसाठी ये-जा धोकादायक ठरू लागली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वीजेचा लपंडाव सुरू असतो. यामुळे रात्रीच्या वेळी या पदपथावर ये जा करणे ज्येष्ठांसाठी तारेवरची कसरत बनली आहे.

कासारवाडी येथे मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. सध्या परिसरातील प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू होत आहेत. दिवसभर मुलांची वर्दळ असते. बहुतांश मुलांना याच पुलावरून प्रवास करावा लागतो. या निखळलेल्या सिमेंट ब्लॉकमुळे शाळकरी मुलांना धोका निर्माण होऊ शकतो.

सबंधित प्रशासनाने या पुलाची पाहणी करावी. मोठी अनर्थ घडण्यापूर्वी पुलावरील निखळलेल्या सिमेंट ब्लॉकची लवकरात लवकर दुरूस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. महापालिकेच्या वतीने प्रत्येक पुलावर लाखो रुपये खर्च करून नागरिकांसाठी पदपथ बनविण्यात आले आहेत. हा पूल पिंपरी ते सांगवी, पिंपळे गुरवचा मुख्य रस्ता आहे. याच रस्त्यावरून नागरिक व वाहनचालकांची वर्दळ सुरू असते. हा जुना पूल असल्याने या पुलावरील बनविण्यात आलेल्या पदपथावरील दोन्ही बाजूंचे सिमेंट ब्लॉक निखळल्याने नागरिकांसाठी येजा धोकादायक ठरू लागली आहे. पदपथावर चालताना मोठी दुर्घटना घडू शकते. पादचार्‍यांना पदपथावरून चालणे जिकिरीचे बनले आहे.

संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या पुलावरील सिमेंटचे ब्लॉक निखळल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, दृष्टीहीन व्यक्तींसाठी ये-जा धोकादायक ठरू लागली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वीजेचा लपंडाव सुरू असतो. यामुळे रात्रीच्या वेळी या पदपथावर ये जा करणे ज्येष्ठांसाठी तारेवरची कसरत बनली आहे. कासारवाडी येथे मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. सध्या परिसरातील प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू होत आहेत. दिवसभर मुलांची वर्दळ असते. बहुतांश मुलांना याच पुलावरून प्रवास करावा लागतो. या निखळलेल्या सिमेंट ब्लॉकमुळे शाळकरी मुलांना धोका निर्माण होऊ शकतो. सबंधित प्रशासनाने या पुलाची पाहणी करावी. मोठी अनर्थ घडण्यापूर्वी पुलावरील निखळलेल्या सिमेंट ब्लॉकची लवकरात लवकर दुरूस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news