Back Pain : कंबरदुखीवर नियंत्रण मिळवणे शक्य, जाणून घ्‍या सविस्‍तर

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.
Published on
Updated on

सतत बैठे काम करणे, पुरेशी शारीरिक हालचाल नसणे, चुकीच्या पद्धतीने उठणे-बसणे, पोषक आहाराचा अभाव, वाढते वजन यासारख्या कारणांमुळे कंबरदुखीची ( Back Pain )  समस्या वाढत असल्याचे दिसते. मात्र या त्रासावर नियंत्रण मिळवणे तितकेसे अवघड नाही. योग्य जीवनशैली, पुरेसा व्यायाम, संतुलित आहार आणि शरीराला योग्य शिस्त लावली तर या त्रासावर नियंत्रण मिळवणे सहज शक्य आहे.

 Back Pain : वेळेवर उपचार महत्त्‍वाचे

अधिक वय असलेल्या व्यक्तींमध्येच नाही तर कंबरदुखीची समस्या हल्ली तरुणांमध्येदेखील वाढत असल्याचे दिसत आहे. सामान्यत: कंबरदुखीमुळे उभे राहणे, वाकणे, वळणे यांसारख्या क्रिया करताना खूप त्रास होतो. सुरुवातीलाच याबाबत उपचार केले नाहीत तर ही समस्या अधिक गंभीर रूप घेऊ शकते; मात्र वेळेवर उपचार केल्यास त्रास कमी करता येतो. खास करून बदललेल्या जीवनशैलीमुळे सतत बैठे काम करणे, पुरेशी शारीरिक हालचाल नसणे, चुकीच्या पद्धतीने उठणे-बसणे, पोषक आहाराचा अभाव, वाढते वजन यांसारख्या कारणांमुळे कंबरदुखीची समस्या वाढत आहे. मात्र या त्रासावर नियंत्रण आणणे तितकेसे अवघड नाही. योग्य जीवनशैली, पुरेसा व्यायाम, संतुलित आहार आणि शरीराला योग्य शिस्त लावली तर या त्रासावर नियंत्रण मिळवणे सहजशक्य आहे.

कंबरदुखीची समस्या विज्ञाननिष्ट द़ृष्टिकोनातून समजून घेणे अत्यावश्यक

अर्थात कुठल्याही त्रासावर, अडचणीवर वा अडथळ्यावर मात करायची तर तो त्रास कशासंबंधीचा आहे आणि कशापायी निर्माण झाला आहे हे विज्ञाननिष्ट द़ृष्टिकोनातून समजून घेणे अत्यावश्यक असते. त्यामुळे आपण कंबरदुखीची मुळं शोधायचा प्रयत्न करूया. आपला पाठीचा मणका ३२ हाडांनी बनलेला असतो. यामधील २२ हाडे सक्रिय भूमिका निभावत असतात. या हाडांच्या गतीमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होतो तेव्हा कंबरदुखीची समस्या सुरू होते. मणक्याच्या हाडांव्यतिरिक्त आपल्या कंबरेच्या बनावटीत कार्टिलेज, डिस्क, सांधा, स्नायू आणि लिगामेंट इत्यादींचा समावेश असतो. यापैकी कुठल्याही भागाला कुठल्याही प्रकारचा त्रास निर्माण झाला म्हणजे कंबरदुखी सुरू होते.

 Back Pain : कंबरदुखीवर नियंत्रण मिळवण्‍यासाठी 'ही' काळजी घ्‍या

आपल्या शरीराची उठण्या-बसण्याची पद्धत योग्य नसेल तर मणक्याच्या हाडाची संरचना बदलते. यामुळे कंबरेच्या खालच्या भागात, मानेमध्ये वेदना सुरू होतात.

  • कंबरदुखीपासून स्वतःचा बचाव करायचा असल्यास नेहमी कंबर सरळ आणि मागच्या बाजूला करून बसावे.
  • शरीराचा भार दोन्ही हिप्सवर बरोबर असला पाहिजे.
  • प्रत्येक 30 मिनिटांनंतर आपली बसण्याची स्थिती बदलली पाहिजे.
  • खुर्चीवर बसल्यानंतर दोन्ही पाय जमिनीवर सरळ करावेत.
  • उभे राहताना छातीबाहेर आणि पोट आतल्या बाजूला असावे. कंबर सरळ आणि गुडघे वाकलेले नसावेत.
  • कंबरदुखी टाळण्यासाठी दीर्घकाळ एकाच स्थितीत उभे राहणे टाळावे.
  • आपली उभे राहण्याची आणि बसण्याची पद्धत योग्य असेल आणि शारीरिकद़ृष्ट्या आपण योग्य प्रकारे सक्रिय असू तर कंबरदुखीची समस्या नक्कीच दूर राखता येते. अर्थात त्यासाठी जाणीवपूर्वक आणि नियमित प्रयत्न केले तरच…!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news