Jodhpur Cylinder Blast : जोधपूर शहरात सिलिंडरचा स्फोट; चार मुलांचा मृ्त्यू

Jodhpur Cylinder Blast : जोधपूर शहरात सिलिंडरचा स्फोट; चार मुलांचा मृ्त्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानमधील जोधपूर शहरात अवैध गॅस रिफिलिंग दरम्यान सिलेंडरचा स्फोट झाला (Jodhpur Cylinder Blast). यामध्ये चौघांजणांचा मृत्यू झाला, तर १६ जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. स्फोटाचा आवाज ऐकून आजूबाजूच्या वसाहतीतील लोकही हादरले आहेत. जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना तीन वाजण्याच्या सुमारास घडली. कीर्ती नगरपरिसरात गॅस गळती झाली होती, याचदरम्यान हा स्फोट झाला असल्याचे त्यांनी सागितले. स्फोट झालेल्या ठिकाणी उभी असलेली वाहने या आगीच्या भक्ष्यस्थानी आली.

या अपघातात निकू (१२), विकी (१५), कोमल (१३) आणि सुरेश (४५) अशी मृत झालेल्या मुलांची नावे आहेत. तर इतर 16 जण जखमी झाले आहेत. यापैकी आठ जण ८० टक्के भाजले आहेत. ज्या घरात रिफिलिंग होत होते ते घर कोजाराम लोहार यांचे असल्याचे तपासात उघड झाले. (Jodhpur Cylinder Blast)

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी व्यक्त केला शोक

कोजाराम यांचा मुलगा गॅस रिफिलिंगचे काम करतो. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे, सध्या समजू शकलेले नाही. रिफिलिंग दरम्यान हा स्फोट झाल्याचा संशय आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot Tweet) यांनी या घटनेची माहिती मिळताच याबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी जखमींवरील उपचारासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत, अशी माहिती दिली.

तपासामध्ये स्फोट झालेल्या घरातून चार डझन घरगुती आणि कमर्शियल सिलिंडर मिळाले आहेत. सांगितले जात आहे की, घरोघरी सिलिंडर पोहोचविणाऱ्या व्यक्तीचे हे घर आहे. या दुर्घटनेत घराचा एक भाग देखील ढासळलेला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले. येथील स्थानिक आमदार मनीषा पवार यांनी सांगितले आहे की, या घटनेबाबत सीएमओ कार्यालयाला याबाबतची माहिती दिलेली आहे. तसेच शहरात अवैध गॅस रिफेलिंगची अधिक चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news